चिंतन राम आयेंगे

आजचे चिंतन
17/4/2024
--------------------------------------- 
*राम आयेंगे*
----------------------------------------
 *प्रभू रामचंद्र जन्म जयंती निमित्त आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!*🌹🌹🌹
आज संपूर्ण देशात श्री राम जन्मोत्सव साजरा होतो आहे.  फक्त श्री रामाचे दर्शन न घेता त्या  मर्यादापुरुषोत्तम रामाकडून काही चांगले गुण घेतलेच पाहिजेत, तरच खऱ्या अर्थाने रामराज्य येईल राम जन्म साजरा केल्याचे सार्थक होईल*
    समाजासाठी प्रभु रामाचे चरित्र काही कारणांसाठी आदर्श, मार्गदर्शक आणि प्रेरक आहे 
आज धकाधकीच्या जीवनात असंख्य कारणाने कुटुंबातून कलह, दुरावा निर्माण झालेले दिसतो.  प्रभु रामचंद्राने राजसत्तेसाठी भावाबरोबर संघर्ष करण्याएवजी  वनवास पत्कारला. यातून *बंधुप्रेमाची प्रेरणा मिळते*. त्या  सद प्रेरणेसाठी आज राम हवाय.
     आई बापाला भावा भावांमधे वाटनी करुण सांभाळन्याचे प्रकार समाजात दिसतात, आज वृद्धाश्रम वाढत आहेत. राजा दशरथाच्या  शब्दाला प्रमाण मानुन वनवासात जाण्याचा निर्णय घेतला. *यातून वडिलांच्या आज्ञेचे पालन, मातृप्रेमाची प्रेरणा मिळते*
 
     *त्या मातृपितृ भक्तिसाठी आम्हाला राम हवाय*.
विषमतावादी व्यवस्थेचा समर्थक असलेल्या मातृघातकी परशुरामाचा संपूर्ण पाडाव केलेला राम आम्हाला हवाय.
    राजांनी बहुपत्नीत्व स्विकारणयाच्या काळात *एकपत्नीव्रत, एक वचनी राम आम्हाला हवाय*
    वर्णवर्चस्वाच्या पगड्यात आजही समाज आडकलेला दिसतोय, रामाला उत्तम बोरे द्यावीत या भावनेने भिल्ल शबरिने दिलेली उष्टि बोरे खाणारा राम आम्हाला हवाय...
होय आम्हाला सर्वधर्म समभाव असणारे रामराज हवी आहे.
 स्वतःच्या फायदासाठी दुसऱ्या धर्माचा द्वेष न करता सर्वधर्मसमभाव म्हणणारा कृतीतून दाखवणारा श्रीराम हवा आहे. 
तर चला मग आपण सर्वांनी मिळूनच या देशाला रामराज्य बनवू या...!!
*श्रीराम नवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...*

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!