दोन पिढ्यातील फरक जगायचं कसं

*आम्ही अजूनही शिकतोय !*
*दोन्हीची कॉकटेल बनवली तर आयुष्य सुखाचे होईल !!*

आधीच्या पिढीकडून *पैसे वाचवायला शिकलो;*
नंतरच्या पिढीकडून *पैसा वापरायला शिकतोय.*

आधीच्या पिढीकडून सहवासाने *नाती जपायला शिकलो;*
नंतरच्या पिढीकडून *डिजिटली नवीन नाती जोडायला* शिकतोय.

आधीच्या पिढीकडून *मन मारून जगायला शिकलो;*
नंतरच्या पिढीकडून *मन भरून जगायला* शिकतोय.

आधीच्या पिढीने, *Use and use more* मधली उपयुक्तता शिकवली;
नंतरच्या पिढीकडून *Use and throw* मधली नावीन्याची *गंमत अनुभवायला* शिकतोय.

आईकडून पिकनिकलाही *घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला* शिकलो;
मुलांकडून *घरात असतानाही पिकनिक एंजॉय करायला* शिकलोय.

आधीच्या पिढीबरोबर *निरांजन लावून दिवा उजळून वाढदिवस साजरा केला;*
नंतरच्या पिढीबरोबर *मेणबत्ती विझवून अंधार करून वाढदिवस साजरा करायला* लागलो.

आधीच्या पिढीने बिंबवले, *घरचेच लोणी सर्वात उत्तम;*
नंतरची पिढी पटवून देत आहे, *अमूल बटरला पर्याय नाही‌*.

थोडक्यात काय, *आधीच्या पिढीने शिकवले, अधिक वर्षे कसे जगायचे ते;*
तर नंतरची पिढी शिकवत आहे, *मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते !!*
दोन्हीच कॉकटेल बनवल तर आयुष्य सुखाच होईल

*सर्व मित्र मैत्रिणींना*  👍👍

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता