आजचे चिंतन28/4/2024

*आजचे चिंतन*

28/4/2024

. संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की.. *लोक काय म्हणतील?**पण आपण ऐकत आलो की शेवटी लोक हेच म्हणत असतात" "राम नाम सत्य है"*
. माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा.. कारण 'तिरडी' उचलण्याच्या वेळी 'तिरस्कार' करणारी लोक सुद्धा रडतात.
. मेल्यावर माणूस चांगला होता.. असं म्हणण्याची प्रथा आहे. आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही, हीच खरी व्यथा आहे.
. म्हणून माणसाला जिवंतपणीच समजून घ्या, मेल्यावर समाधीवर फुल वाहण्यात कांहीच अर्थ नसतो..
. *चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधावर ठेवतो... कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचे असते.. चांगल्या माणसाचा सुद्धा अगदी नेमकं तसंच असतं.*!!
. भावकीतली चार माणसं एका दिशेने तेंव्हाच चालतात जेंव्हा पाचवा खांद्यावर असतो.
. *ज्यांना आपण कुठे चुकलो हे समजून घ्यायचे नाही अशा लोकांना समजावून सांगण्यात वेळ घालवू नका... कारण ते स्वतःची चूक तर समजून घेतच नाहीत उलट आपल्याला चुकीचं ठरवतात.*
. *आयुष्यात अशी कांही लोक आपल्या जीवनात येतात जी फक्त नावापुरतंच आपल्याला आपलं मानतात बाकी त्यांचं जग वेगळं असतं.. आणि आपण उगाच त्यांना आपलं मानत असतो.*
. *आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे... आपण आरशाप्रमाणे राहायचं, काळजी त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे.*!!
. "हे देवा' आयुष्यभर फक्त एकच चूक मी करीत राहीलो..! "धूळ" चेहऱ्यावरच होती मी मात्र आरसा पुसत राहीलो!!
.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!