गझल हरी भगिनी 30 मात्रा

*गझल मंथन कार्यशाळा*

*वृत्त - हरिभगिनी*

*मात्रा : 8+8+8+6 = 30* 

*रदिफ : जरा जरा*

*कवाफी-: शोधणे सांधणे  ओढणे फोडणे जोडणे  नांदणे सोडणे सरकणे उमलणे धरणे  पाहणे जागणे

*कठीण कामे सहज साधणे जमते आहे जरा जरा*
*तडजोडीने मार्ग काढणे जमते आहे जरा जरा*

*कामामध्ये ना गुंतावे उसंत घ्यावी घरातुनी*
*छंदासोबत  आता जगणे जमते आहे जरा जरा*

*पौषामधला संक्रांतीचा सण प्रेमाने भरलेला*
*द्वेषालाही बोथट करणे जमते आहे जरा जरा*

*फुले समजुनी  दुःखी काटे माळत बसले मनोमनी*
*वेदनेसही जपत राहणे जमते आहे जरा जरा*

*सासरच्या या वाटेवरती रखरख दिसते क्षणोक्षणी*
*हसतमुखाने तिथे चालणे जमते आहे जरा जरा*


सुरेखा

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता