जीवनाची ही गाडी अशीच चालू असते

जीवनाची गाडी ही अशी चालू असते रोज आपण आणतो राशन 
जातो ऑफिस दुकान सोडतो मुलांना ट्युशन 
हे तर आपलं रोजच गणित बनले 
त्यात काय सोल्युशन परंतु जीवनाच्या गाडीत संस्काराचा क्लच,संस्कृतीचा ब्रेक, कला आणि कर्तव्याचा इंडिकेटर, सामाजिक बांधिलकीचा हॉर्न, आत्मविश्वासाचं इंधन घातलं की जीवनाची स्पीड ब्रेकर वर सुद्धा अगदी सुरळीतपणे चालते. 
त्यासाठी प्रयोजन असतं चातुर्मासाचे, पर्युषण पर्वाचे व वास,तपस्या, नृत्य, वाचन, लेखन असे एक ना अनेक आपले छंद...!झाले कधी, ना होणार कधी बंद, अहो असेल आवड तर निघेल सवड प्रयत्नाने चढता येईल एक एक गड 
अहो चूल आणि मुल कोणाला चुकले  सुनामीत संसार आत्मविश्वासाने टिकले 
यश अपयशाची ही इथे वाटत नाही भीती  
कारण इथेच आपलेपणाने जोडली जातात नाती ठेवा जागेवर सापडेल वेळेवर हा असावा आपल्या शिस्तीचा मंत्र कारण आपण स्वतःसाठी तरी असावे गाडगेबाबा संत दुसऱ्याच्या अस्तित्वाला ठेच न पोचवता अस्तित्वात ठेवा आपले अस्तित्व कारण आपले संत सांगतात मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा हीच खरी ईश्वर सेवा