भुजंगप्रयात मला लेखणीचा सहारा मिळाला

लगागा लगागा लगागा लगागा
वृत्त -भुजंगप्रयात
सहारा
किनारा
उतारा 
निवारा 
पिसारा 
घसारा 
फवारा

*मला लेखणीचा सहारा    मिळाला*
*सुखाचा मनाला किनारा मिळाला*


*तुझे नाव घेता सदा विठ्ठला मी*
*तुझ्या पायरीशी निवारा मिळाला*

*अहंकार सोडून देता समजले*
*मला  वेदनेवर उतारा मिळाला* 

*किती त्रास सोसू  पतीचा कळेना*
*मला जाळणारा निखारा मिळाला*

*नवे स्वप्न आशा पुन्हा फुलविताना*
*मनाला  सुखाचा पिसारा मिळाला*

शिदोरीत संस्कार देता मुलीला
सुखी जीवनाचा इशारा मिळाला

*मनाला फुलवले फुलासारखे तू* 
*मला अत्तराचा फवारा मिळाला*

सुरेखा

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता