गझल भुजंगप्रयात मला लेखणीचा सहारा मिळाला
लगागा लगागा लगागा लगागा
वृत्त -भुजंगप्रयात
सहारा
किनारा
उतारा
निवारा
पिसारा
घसारा
फवारा
*मला लेखणीचा सहारा मिळाला*
*सुखाचा मनाला किनारा मिळाला*
*तुझे नाव घेता सदा विठ्ठला मी*
*तुझ्या पायरीशी निवारा मिळाला*
*अहंकार सोडून देता समजले*
*मला वेदनेवर उतारा मिळाला*
*किती त्रास सोसू पतीचा कळेना*
*मला जाळणारा निखारा मिळाला*
*नवे स्वप्न आशा पुन्हा फुलविताना*
*मनाला सुखाचा पिसारा मिळाला*
शिदोरीत संस्कार देता मुलीला
सुखी जीवनाचा इशारा मिळाला
*मनाला फुलवले फुलासारखे तू*
*मला अत्तराचा फवारा मिळाला*
सुरेखा