महावीर जयंती माता त्रिसेला पुरस्कार 2023
*स्वानंद महिला संस्था श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा*
दिनांक 3/ 4/ 2023
*माननीय संपादक नमस्कार*
विषय *भ. महावीर जन्म कल्याणक निमित्त माता त्रिशला माई रमा पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील कृतिशील उत्कृष्ट विद्यालय पुरस्कार व दिव्यांग मुलां समवेत वितरागवानी काव्य संमेलन*
*भगवान महावीरांची जीवन प्रणाली आजच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाची- मा. सौ अनुपमा पवार*
सर, स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बहरदार काव्य संमेलन झाले. या काव्य संमेलनात अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कवयित्री सुवर्णा नहार, प्रतिभा जैन, सीमा गांधी, सुनीता लुनावत , प्रियंका शहा यांनी पोवाडा सादर करून काव्य संमेलनात सर्वांचा आनंद द्विगुणीत केला. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांनी नवकार महामंत्र व स्वागत गीत सुरेल आवाजात गाऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष उमेश जी पाटील, डॉ अशोकजी पगारिया, सुभाषजी ललवाणी प्राध्यापिका सुरेखा कटारिया सुनीता बोरा ,लता पगारिया, कल्पना कर्णावट , व्यासपीठावर होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जैन विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष शांतीलालजी लुंकड व पुष्पाजी लुंकड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख उपस्थिती देवेंद्र बाकलीवाल, नितीनजी बेदमुथा, प्रा.प्रकाशजी कटारिया, अजितजी पाटील, विजय भिलवडे, श्रेयस पगारिया, सुभाष सुरणा, विलास पगारिया, मोतीलाल चोरडिया,नेनसुख मांडोत, संजय खाबिया, साधना सवाने, सुजाता नवले, मीना पोकरणा, वर्षा टाटिया, कुसुम भंडारी या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माता त्रिशेला व माई रमा या पुरस्काराचे वितरण झाले. तसेच अंध विद्यालयातील दिव्यांग मुलांसमवेत संस्थेचे संस्थापक शांतीलालजी लुंकड, पुष्पाताई लुंकड, मुख्याध्यापक साळुंके सर व अधीक्षक कांबळे सर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील कृतिशील उत्कृष्ट विद्यालय पुरस्कार देण्यात आला.
तर महाराष्ट्रातून निवडलेल्या आणि कार्यने आणि सर्वांना आवडलेल्या अशा माता भगिनींना यांना *माता त्रिशल माई रमा* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
*सौ अनुपमा उमाजी पवार- सहाय्यक कमिशनर शैक्षणिक क्षेत्र*
*सौ पुष्पाबाई चुनीलालजी कर्णावट - सामाजिक क्षेत्र*,
*श्रीमती पद्माकुमारी प्रध्नकुमार डुडू -अध्यात्मिक क्षेत्र*,
*सौ कविता संदीप मेथा-धार्मिक क्षेत्र*.
स्वानंदच्या अध्यक्ष सुनीता बोरा यांनी या दोन वर्षात संस्थेत चाललेल्या विविध कार्याचा आढावा घेतला. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापिका सुरेखा कटारिया म्हणाल्या, "गेली 30 वर्ष स्वानंद संस्था समाज उपयोगी समाज उथ्यानासाठी कार्य करत आहे. घुंगटामध्ये असणारी स्त्री बुरसटलेल्या विचारधारेतून, घुंगटातून बाहेर पडत आहे. "
कार्यक्रमानंतर दिव्यांग मुलांन समवेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री सीमा गांधी व सुनिता लुनावत यांनी केले. तर स्वागत व मनोगत स्वानंद अध्यक्ष सुनीता बोरा यांनी केले. आभार सौ. साधना सवाने यांनी मानले.