व्योमगंगा, भुजंगप्रयात वृत्तातील गझल

 गालगागा गालगागा गालगागा गालगागा
वृत्त :व्योमगंगा

काय सांगू काय झाले  वार सारे सोसताना
यत्न काही व्यर्थ गेले
बाण तेव्हा सोडताना

दुःख नाही आज वाटे भोग आता संपलेले
आत माझ्या मोद आहे शांत शांत बोलताना 

ऐकते मी आज तुम्हा लाघवाने बोलता ते
टोचले होतेच तेव्हा पाप पुण्ये तोलताना

वाटले ते बोलण्याचे धैर्य तेव्हा का न केले
योग आता संपलेले व्यर्थ
नाते जोडताना

सावकारे लूट केली कोण आले वाचवाया
दैवशापे राख झाली  दुःखे मोठी कोंडताना

बोल होते डागणारे 
कान मी ही झाकलेले
भाव नाही आटलेले
खंत आहे तोडताना

पेरते मी स्वप्न माझे
पीक हाती दे यशाचे
जाणते की कष्ट देती
मोल त्याचे जोडताना

अंजना कर्णिक ©®
[17/04, 10:22 am] katariyasurekha: वृत्त : भुजंगप्रयात 

वृथा भावनांचा पसारा कशाला
तुझ्या अंतरीचा इशारा कशाला

नको आठवांचा पुरावा जराही
मला जाळणारा निखारा कशाला

सख्या ऐक आता नको स्पर्श हळवा 
उगा कोंडणारा शहारा कशाला

मनाच्या तळाशी जरा ओल नाही
व्यथेच्या नदीला किनारा कशाला

नको हक्क सांगू मला कोणताही
सदा काळजावर पहारा कशाला

©®अक्षता देशपांडे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!