चिंतन आडात असेल तर पोहऱ्यात येईल

*चिंतन  -आडात असेल तर पोहऱ्यात येईल.*

दि. 14/2/2022

मंगळवार
व्हॅलेंटाईन डे काही ठिकाणी याचे औचित्य साधून तो साजरा केला जातो. परंतु भारतीय संस्कृती प्रमाणे  व्हॅलेंटाईन डे रोजच असायला हवा. कारण भारतीय संस्कृती ही प्रेम, समर्पण,त्याग, बलिदान, आपलेपणा, यावर अवलंबली आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करून कृती करण्या पेक्षा  आपल्या भारतीय संस्कृतीचे चिंतन करून आपला रोजचा दिवस सुवर्णमय कसा होईल याचे चिंतन करणे खूप महत्त्वाचे. ..! 
भारतीय संस्कृती सांगते स्पर्धा ही आपल्या संकटांशी ठेवावी आपल्याबरोबर  ज्यांनी आयुष्याचे  क्षण आनंदाने घालवलेले  असतात त्या आपल्या माणसांशी न ठेवता स्वतःशी ठेवणं महत्त्वाचं. ...! कारण, आपल्याला मनं जिंकायची आहेत, माणसं गमवायची नाहीत. हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य आठवले. 
प्रवीण दवणे म्हणतात, स्वभाव म्हणजे रंगांची पेटी..कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला  कोणत्या  रंगात रंग मिसळेल याचा अंदाज करता  करण कठीण होते . 
स्व:ताच्या जीवनाचे चित्र रंगविताना इतरांची चित्रं बिघडणार नाही याची याची जाणीवपूर्वक  काळजी घेतली की आपल्या जीवनातील भरलेले  रंग अधिकच खुलतात. सुख असो, दुःख असो, नैराश्य असो, आनंद असो या सर्व परिस्थितीमध्ये आपली माणसं आपल्याबरोबर  राहतात 
 आपल्या समर्पित वागण्याने आपल्या बरोबरच राहतात व कोणत्याही प्रसंगात ती आपली साथ करत असतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. 
त्यामुळे मन समाधानी राहते चित्त आनंदाची अनुभूती घेते व दुसऱ्याचे मन संभाळण्यासाठी स्वतःचे मन समाधानी असणे. आनंदी असणे महत्त्वाचे असते. *अडात असेल तर पोहऱ्यात येईल*

 प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे ते 33
मो नं. 9822745030

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!