नूतन वर्ष अभिनंदन 20 23 नवीन वर्षात बिनधास्त जगा व जगू द्या

*नविन वर्षात बिनधास्त जगा व जगू द्या*    
*नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*🌷🌷🌷🌷🌷

दहा वर्ष बालपण सर्व *भासे समसमान  आनंदाचे गाते गीत*             
विसाची होय भरती अंगी चढे मद आती नसे कसले भान मनावरती पैसे कमावण्या धाव धावती  गाडी बंगला पैसा मिळवण्या धावती. *कला हस्तगत करा म्हातारपणी ती कला तुम्हाला साथ करेल तारेल*
तिसाची होय भरती कन्या पुत्र लाभती तेव्हा नकळे मनाची स्थिती  मुलांसमोर *आई-वडिलांची सेवा करा तरच मुले तुमची करतील जसे पेराल तसे उगवेल*
चाळिशी पार केली की  डोळ्या चाळीशी येते .जास्त शिकलेला' आणि 'कमी शिकलेला' दोघेही सारखेच.. *कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका*
 पन्नाशी येता शाम केस शुभ्र होती 'सुंदर' आणि 'कुरूप' हा भेदभावच नष्ट होई....दोन्ही समच  *दिसण्याचा गर्व करू नका मन सुंदर ठेवा*
साठीला काठी हाती .'मोठी पोस्ट' आणि 'लहान पोस्ट' असेही काही उरत नाही....*दोन्ही सारखेच  त्यासाठी की मान अपमान मनात धरू नका*
सत् तरी च्या विवंचना बसलेले उठवेना 'मोठे घर' आणि *लहान दार  विचार सुद्धा मनी न येई
सांधेदु:खी बळावून हालचाल करणे मुश्किल होई  *सातत्यपूर्ण सतत व्यायाम करा* 
*ऐंशीनंतर गाठीशी 'भरपूर पैसा' असला काय अन् नसला काय.... दोन्ही सारखे*
 *पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न? त्यासाठी फिरून घ्या दान करत रहा*. 

 नव्वदीच्या विवेचन बसलेले उठावे ना उठलेले चालवे ना *बसणे व  उठणे यात  फरक राहत नाही...दोन्ही सारखेच उठून बसल्यावर आता करायचे काय? हा गहन प्रश्न? यासाठी माणसे जोडा...*! 

*जीवन  सुंदर आहे.. ते अधिक सुंदर करा या पल्ल्याच्या  मानवी थांब्यावर आपण शर्यतीत  सगळे समानच आहोत तेव्हा निर्भेळ आनंद लुटा,हसा खेळा मस्त रहा.* यासाठी हे कराच *वर्तमान काळाचा समताधारी भविष्याचे पच्चकान प्रत्याख्यान भूतकाळाचे प्रतिक्रमण करत रहा. जीवन सुंदर आहे ते अधिक सुंदर करा

*नवीन वर्षाच्या शुभेच्छा*

प्रा. सुरेखा कटारिया चिंचवड, पुणे 33

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!