वेळोवेळी कविता

*वेळोवेळी*

21/12/2022

*शोधणारे डोळे याद देतात वेळोवेळी*
*मिळतो दिलासा साथ देतात वेळोवेळी*

*गरजे नुसार पावतो रुसवा कशास आता*
*छेडतो कशास रे सख्या मजसी वेळोवेळी*

*खोट्या दिलेर बाता भारून खूप केल्या*
*गेला आवाज त्यांचा कर्मफळे वेळोवेळी*

*प्रिये पुढे प्रियकर आणतो सोंग सारे*
*सोंगट्या टाकुनी खेळतो वेळोवेळी*
 
*या बोल घेवड्यांच्या शब्द होड्या पाण्यात गेल्या*
*आवाज गर्जनांचा गरजतो नुसताच वेळोवेळी*

*समर्पण काय आहे ठाऊक ज्यास नाही*
*घ्यावी खुशाल त्याची हजेरीच वेळोवेळी*

*प्रा. सुरेखा कटारिया चिंचवड पुणे*

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता