राम-लक्ष्मण बंधुप्रेम
*राम लक्ष्मणाचे बंधु प्रेम*
*21/12/2022 -बुधवार*
🙏🪷🪷🪷🪷🪷🙏
*आदरणीय समाजभूषण असणारे केवळचंजी कटारिया यांना* प्रा सुरेखा कटारियाचा सादर जय जिनेन्द्र
भाऊ नुकतच झालेलं या ऑल इंडिया कटारिया फाउंडेशनचे पंचम राष्ट्रीय अधिवेशन सर्वांना खूप काही शिकवून गेलं. खूप काही सांगून गेलं.
. आपल्या कृतीतून आम्हाला सतत जाणवायचं, सवडीने नाही तर आवडीने बोलणाऱ्या माणसाला जपलं पाहिजे... म्हणूनच कटारिया भाईपासाठी घेतलेलं हे राष्ट्रीय पंचम संमेलन कटारियांच्या नव्हे तर मानव जातीला एक चांगला आदर्श घालून देणारे असे हे कटारिया राष्ट्रीय पंचम अधिवेशन आनंदात संपन्न झाले झाले.
भाऊ आपल्या जीवनाकडे पाहिलं की असं वाटतं आयुष्य एकदाच मिळतं ते जगून पहा... पाहून जगू नका..!!
. आयुष्यात सरलेले दिवस नशीब म्हणून सोडून द्यायचे, आणि उरलेल्या दिवसाचे नशीब घडवायचं..!! असे नसीब आपण आपल्या पुरुषार्थाने घडवून भारतातील नव्हे जगातील कटारियाना एकत्र करून एक आगळावेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. आज स्वर्गीय घेवर भाऊ आपल्यात नाहीत.परंतु खरोखरच
. *माणुसकीचे दुसरे नाव घेवर भाऊ आहे, सर्व प्राणीमात्रावर हृदय पूर्वक प्रेम करणे हीच मानवता आहे..!! हा संदेश त्यांनी त्यांच्या कृतीतून दिला*.
केवळ ज्ञान असून उपयोग नाही. ते केंव्हा आणि कसं वापरायचं याचे ही ज्ञान असल पाहिजे..
*होकार नकरायला आणि नकार होकरायला सिंहाचं काळीज लागतं.. ते आम्हाला तुमच्या दिसलं*.
. अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना कोण विचारलं असतं.
. परिवारामध्ये दिसलं. विनयशील असा हा परिवार सर्वांशी अतिशय प्रेमानस्नेहान सर्वांशी आपुलकीने वागत होता. शोभा भाभीजी रोहिणी भाभीजी उषा भाभीजी सर्व सुना नातसुना यांची आपलेपणाची भावना आम्हाला आपल्या सर्वांच्या कृतीतून जाणवत होता.
.*जीवनात आणि जेवणात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा येतच नाही*!!!
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखवू नका जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते.
*आई वडिलांचा भाऊ-बहीणीचा हात पाठीवर असेल तर जीवनात बाकी कांही नसले तरी चालते. अशा या साऱ्या कटारिया परिवारावर वरदहस्त असणारे आमचे केवळचंजी कटारिया आमच्या जीवनात खूप महत्त्वाचे*
. आयुष्यात नशिबाचा भाग एक टक्का तर परिसर, स्वतःच्या पुरुषार्थाचा भाग भाग 99% असतो...
. आपल्याला जे जे पाहिजे ते सहज मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती.
कोणत्याही कामाला सुरुवात करताना हजार वेळा विचार करा. पण एकदा काम सुरू केल्यावर लाख अडचणी आल्या तरी मागे हटु नका. हे आपल्या कृतीतून... भारतातल्या कटारिया परिवाराला एकत्र करणारे, जोडून ठेवणारे, सांगणारे आपले सारे उद्योगपती बंधू ललितजी, शांतीलालजी, सतीशजी, प्रवीणजी, प्रदीपजी व आपली सारी नातवंड संतोषजी, चेतनजी, मयांकजी अतिशय विनयशील. ..! खरोखरच आजच्या या जमान्यात सर्वांसाठी कौतुकास्पद आहे. एक आदर्श आपल्या परिवाराने सर्वांसमोर ठेवला आहे.
आपल्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आम्हाला असं जाणवतं *पाणी गढुळ झालं असेल तर ढवळीत बसू नका.तर शांत हो द्या. मग गाळ आपोआप खाली बसतो....*
तसेच जीवनात ताण आला तर बेचैन न होता शांत विचार करावा. उपाय नक्की सापडेल.. हे आपल्या सहवासात आम्हाला सतत जाणवत गेले. आपल्या मनातील स्पष्टता सांगताना सुद्धा अतिशय विनयशील विनम्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारे भाऊ आपण कटारिया परिवारासाठी देवदूत आहात.
.*चांगली माणसं सोबत असली की वाईट दिवस सुद्धा चांगले होतात*!! अगदी आपण आमच्या सर्वांच्या सोबत आहात म्हणूनच आम्ही सुद्धा खूप आनंदान समाजासाठी काम करण्यासाठी आपलीच प्रेरणा घेत आहोत.
*केवळभाऊ आपण महिलांना कार्यक्रम घ्या म्हणून सांगितल्यानंतर आम्ही महिलांनी कार्यक्रमाचे ही आयोजन दोन वर्ष केले* .आपण कोणतीही कार्याची जबाबदारी दिल्यास ती आम्ही आनंदाने स्वीकारून यशस्वीतेने पार पाडण्याचा प्रयत्न 🙏.
*आपणास शता आयुष्य लाभो हीच ऑल इंडिया कटारिया महिला विभागातर्फे जीरावाला पार्श्वनाथ चरणी विनम्र अभिवादन*!
*पुनश्च एकदा आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक🌷 अभिनंदन!
कळावे
आपली स्नेहांकित
प्रा सुरेखा प्रकाशजी कटारिया- रांजणगाव गणपती, चिंचवड- पुणे ,महाराष्ट्र🙏