, गुरुपौर्णिमेवर लेख
गुरु पोर्णिमा
हिऱ्याला पैलू पाडतो तो गुरु आत्मविश्वासाने जगायला शिकवतो तो गुरु येणाऱ्या समस्यांना सामोरे जाण्याची ताकद देतो तो गुरु अशा सद्गुरूची रुजवण करणाऱ्या तुमच्यात असणाऱ्या सद्गुरुला मनःपूर्वक नमन ,वंदन प्रत्येकव्यक्तीला अनेक गुरु असतात.. माझे चाहते वाचक हे ही माझे गुरुच आहेत.. प्रत्येकाला वंदन करुन , मनातला सद्भाव तुम्हाला द्यावा वाटतोय..
अगदी आत्ताची गोष्टी. मी व माझे फ्रेंड्स नातेवाईक आम्ही पेलिंग, लाछेन लाछेन घाटात जाऊन प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी सिक्कीम राज्या तील धबधबे पहात फोटो काढत भिजायचा प्लॅन केला.अतिशय नयनरम्य निसर्गाचा आविष्कार. ....! पाहुन दरवर्षी प्रमाणे या ही वेळी डोळे तृप्त.निसर्गाची किती वेळा कृतज्ञता व्यक्त करु असं झालं.. ढग पाऊस तोही बर्फाचा यांचा चाललेला लपंडाव आमच्या दृष्टीपटलावर पुन्हा पुन्हा कोरला जात होता.एक धबधबा पाहुन पुढे गेलं की अजुन एक धबधबा .. जवळपास 300 धबधबे पाहीले असतील.. प्रत्येकाचं सौंदर्य अलगच. कोणी पसरट तर उभा ठाकलेला तर कोणी आडवा.. कोणी डायरेक्ट दगडाला भिडत होता. तर कोणी प्रियकर प्रेयसीला न्याहाळत त्यांना भिजवुन एकमेकांच्या मिठीत देत होता.मला माहीत नाही माझ्या मित्रांना हे धबधबे कसे जाणवले .पण ते दिवस होता.. अविस्मरणीय होते . आपल्याला निसर्ग नेहमीच भरभरुन देतो.. कालही त्याने माझ्यासाठी मिठीतील मिठाई ठेवली
स्टोरी सांगण्याआधी तुम्ही मी लिहीलेला " सुखद सुखद आणि सुखद " हा लेख आठवा..अगदी गेल्याच आठवड्यात मी तो अनुभव शेअर केला होता.. ज्यानी वाचला नसेल त्यांनी जरुर वाचा.. काल ताम्हीणीमधे ते प्रेमीयुगुल पुन्हा भेटले.. अर्थातच माझेच मित्र असल्याने आम्ही ताम्हीणीत आहोत हे त्यांना माहीत होतं पण ते तिथे येउन मला सरप्राइज देणार हे माहीत नव्हतं.. आम्ही सगळेच खुप भिजलो.. खुप फोटो काढले.. आणि ४ च्या सुमारास आम्हाला भुक लागल्याची जाणीव झाली म्हणुन एका धाब्यावर खायला गेलो.प्रचंड दंगा घातला होता.. थंडी वाजत होती आणि समोर भला मोठा डोंगर त्यावरुन वहाणारे धबधबे हा अनुभव माझ्या वाचकानी स्वतःच घ्यावा.. स्वर्ग धरणीवर होता आणि त्या धबधब्याना कोणाची नजर लागु नये म्हणुन मधेमधे ढ्ग त्यांना पदराआड लपवत होते.. हा खेळ मनात हृदयात साठवत आम्ही जेवत होतोआणि तितक्यात ही जोडगोळी आम्हाला दिसली.. दोघांनी येउन पुन्हा एकदा मला मिठीत घेतलं.. तेही आमच्या टेबलवर बसुन जेवायला लागले आणि तितक्यात मैत्रीण म्हणाली , सुरेखा तुला तुझ्या लेखणीतली मिठास ऐकायची का ग ?
मी तुझ्यासाठी ...ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक होते. ती तिच्या भावना गुलु गुलु बोलून सांगायला लागली पारस खाजाचे एकेक पदर उलगडून दाखवावा अगदी त्याप्रमाणे तिने गुलु गुलु बोलू मधील एक एक कविता, बडबड गीत मला सांगितलं.
माझ्या आनंद अश्रूतुन हृदयात मी साठवत होते. ते माझ्या सखी न सांगून सुंदर गुलूगुलू बोलूया पुस्तकाचा अभिप्राय दिला. आणि छोटी मुलं नाचू लागली हे पाहून मी खूप आनंदले तिच्या भावनाना मोकळी करुन गेली .ढग फुटीसारखे फुटलो तो पाऊस.. आनंद देणारा माझे वाचक म्हणतात आपण उत्तम लेखिका आहात परंतु याहीपेक्षा आलेले अनुभव माणसाला समृद्ध करत असतात. ही समृद्धी लेखणीतून जेव्हा झिरपते तेव्हा परकाया प्रवेश करून इतरांना आनंद देण्याचे काम लेखणी करत असते. म्हणूनच गुलूगुलू बोलू हे आपल्यासाठी. ..!
*गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा*
*प्रकाश कटारिया चिंचवड पुणे ३३*