कवितेचे झाड

कविता दिना निमित्त

*कवितेचे झाड*
------------------------
२१/३/२०२२
------------------------

कवितेच्या झाडाला शब्दांच्या पानाफुलांच गोंदणं
टाळ्यांची दाद मिळता शब्द जणू रसिक मनाचं गोंदणं...

शब्दांनी बहरलेली कविता
भावनांनी भिजलेली
शब्द अलंकाराने सजलं जणू सरस्वतीचं गोंदणं...

सुख दुःख सावरण्या साथ देई कवितेवरची भक्ती 
कवितेच्या राऊळी शब्द शक्तीच्या अलंकाराच गोंदणं...

गर्भ भरल्या या शब्दांनी होतो भावनांचा निचरा
कवीच्या मनःपटलावर उमटेल आनंदाच जणू गोंदणं...

कवितेच्या चंदनी वृक्षाला लगडली शब्दांची पाने फुले
शब्दांचे गाणे होता शब्द जणू रसिकांच्या मनाच गोंदणं...

कवितेची अक्षरे अंकुरावी सारस्वतांच्या मातीत
शब्द अंकुरता पालवी फुटे जणू अलंकारच  गोंदणं...

ममं कविता जातीपातीच्या पलीकडंच शब्द कोंदणं
अशी कविता बाबासाहेबांच्या अंतर मनाचं गोंदणं...

सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33.

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण