होळीचा प्रेमसंदेश

१७/३/२०२२
*********************

समतेचा सणा आला होळी
जाळण्या राग द्वेष येते होळी


हर्षभरे रंग उधळण्यास येई
विरह दूर करण्या सण होळी


भिजवून हेवेदावे थिजवीण्या 
रंग रंगात  सण आला होळी 


पळस फुलांनी तप्त उन्हात
ग्रीष्माचे स्वागत करते होळी


शरदाला निरोप देत देत सांगे
झाडे लावा झाडे जगवा होळी


निसर्गाची रंगपंचमी देशभक्ती
एकात्मतेची शक्ती दावते होळी

सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33.

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण