मनाचा आरसा
मनाचा आरसा
12/2/2022
सुरेखा कटारीया. चिंचवड पुणे33 ----------------------------- हर क्षणाचा बोध दावतो हरजीवनी आरसा जनमनाचा शोध घेण्या प्रतिबिंबीत आरसा...! उदार मतवादी वर्तमानी जगण्या सांगूनी फोटो संग्रह कधीच करत नाही आरसा...! बाल तारूण वार्धक्य तील बदल जागवूनी वयानुसार बदलणारे रूप दाखवतो आरसा...! मणमणाच्या मनातील बेड्या संपवून
प्रंचड ऊर्जा दाखवितो जणासी आरसा...! जो मनी मानसी खोट्याच जगता पाहतो! करतो त्यासी अजाणता अंतर्मुख आरसा...! देहाच्या आजरी स्पंदनाचा संवाद साधूनी जीवनाचा सत्य सारं सांगतो तो आरसा...!