प्रा सुरेखा कटारिया -जैन लेखिका, कवयित्री, कथाकथनकार, निवेदिका,व्याख्याता.श्री.आनंद मंगल एज्युकेशन बिजलीनगर सर्वे- 60/1/A बिजलीनगर चिंचवड पुणे 33ईमेल- katariyasurekha@gmail.comमो.नं.9822745030-----------------------------आम्ही लेखिका संचालक मंडळ पुणे, जिल्हा ग्रुपसस्नेह नमस्कार,नवदुर्गा पुरस्कारासाठी माहिती आम्ही लेखिका ग्रुप सदस्य क्रमांक 86 आपले निवेदनानुसार मी हे लिहित आहे. आपण अशा पद्धतीने पुरस्कार देऊन आमच्या पाठीवर शाबासकीची थाप देत आहात. हे वाचून खूप आनंद वाटला. मी माझा पुढे संक्षिप्त परिचय देत आहे.नाव प्रा सुरेखा कटारिया पुणे चिंचवड जन्म दि. 3/6/1960 पत्ता- श्री.आनंद मंगल एज्युकेशन ट्रस्ट बिजली नगर चिंचवड पुणे 33 फेसबुक पेज प्रभावी भाषणकला.ओळख- 24 वर्ष भारतीय जैन संघटनेचे विद्यालय पिंपरी मध्ये *शिक्षिके पासून उपप्राचार्या पर्यंत सेवा गृहिणी-एक मुलगा एक मुलगी दोन नातवंड. रूढी परंपरेच्या घुंघटा मधून उपप्राचार्य पर्यंतचा प्रवास*🙏🙏🙏विद्यालयात असल्यापासूनच लिखाणाची सवय व आवड, लेखिका, निवेदिका, कथा कथनकार,परीक्षक देश-विदेशात विविध विषयावर व्याख्याने. तसेच निवृत्ती नंतर स्किल डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग सेंटर सुरू करून हजारो महिलांना प्रशिक्षित केले आहे.शिक्षण- दहावीनंतर सारे बहिःस्त शिक्षण - बारावी, बीए, एम ए, बीएड, डीसीएम.लेखन- आनंदयात्री या संत साहित्य ग्रंथास ज्ञान प्रबोधनी मातृमंदिर तर्फे हे साहित्यरत्न प्रथम क्रमांक पुरस्काराने सन्मानित पाच हजार रुपये लेखकास तीन हजार रुपये संपादकास मिळालेतसेच प्रभावी भाषण कला साधना आणि अविष्कार, गोष्टीरूप भगवान महावीर , आनंदीआनंद, काव्यसंग्रह- गंमत जंमत व्हीसीडी- तसेच आनंदयात्री कथाकथनाची व्हीसीडी, तसेच जवळ-जवळ दीडशेपेक्षा जास्त डॉक्युमेंट फिल्मची निर्मिती स्वरचित कवितांची काव्यसंमेलन अनेक कवितांना पुरस्कार त्यातील विशेष म्हणजे लिहिलेल्या कवितांची संगीतबद्ध केलेली गाणी प्रकाशित विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन, कथाकथन स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, लेखनस्पर्धा सुंदर, हस्ताक्षर स्पर्धा, नाट्यस्पर्धा इत्यादी तसेच पुणे आकाशवाणीवर , दूरदर्शन वर विविध कार्यक्रमाचे सादरीकरण माझी माय मध्ये सह्याद्री दूरदर्शन वर कार्यक्रम त्याची लिंक पाठवीत आहे. या लॉकडाउनच्या काळात समकालीन मराठी जैन कथेचे लिखाण व प्रसिद्धही महिला सक्षमीकरणावर झूम मीटिंग द्वारे व्याख्याने आनंद यात्री या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या प्रकाशित आनंद यात्री या कथाकथनाच्या व्हीसीडीच्या पाच आवृत्त्या प्रकाशित आकर्षक मेहंदी डिझाईन या पुस्तकाचे संपादन तसेच नियतकालिक-जिद्द, स्वानंद व महाराष्ट्र जैन इतिहास परिषद या अंकाचे संपादन विविध वृत्तपत्रांमध्ये लेखन- सकाळ, लोकमत, प्रभात- प्रभावी भाषण कलेची लेखमा, नवाकाळ, पुढारी,जैन जागृती ,जैन परंपरा, तीर्थंकर अंक इत्यादी मध्ये लेखन पूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानमाले मध्ये व्याख्याने तसेच *अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलन आत्तापर्यंत तेरा भरविली आहेत*. महिलांनी महिलांसाठी निर्माण केलेले हे व्यासपीठ पीठ यावर अनेक मान्यवर महिला या व्यासपीठावरून उद्बोधन ! विशेष म्हणजे *भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील* यांच्या हस्ते ते अकराव्या स्त्री साहित्य कला संमेलनाचे उद्घाटन ही आम्हा सर्वांस कौतुकाची बाब *पुरस्कार- ज्ञान प्रबोधिनी मातृसंस्था साहित्यरत्न पुरस्कार प्रथम क्रमांक पाच हजाराचे बक्षीससुमेरु प्रकाशन तर्फे प्रभावी भाषणकला अविष्कार या पुस्तकात 15 हजारांचे मानधन केंद्र सरकार युवा नेहरू केंद्रातर्फे कर्तुत्ववान महिला पुरस्कार पिंपरी चिंचवड मनपा तर्फे हे आदर्श शिक्षक पुरस्कार यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय प्रतिष्ठान तर्फे गदिमा पुरस्कार तसेच काव्य लहरी नारायण सुर्वे पुरस्कारआज पर्यंत विविध संस्थांनी 126 पुरस्काराने सन्मानित केले आहे *घुंगटातून बाहेर* या आत्मचरित्राचे लिखाण चालू आहे. आता एवढेच पुरे धन्यवाद

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!