हातात हात पकडला पाहिजे* कविता
*हातात हात पकडला पाहिजे* 🩷🩷🩷🩷🩷🩷🩷 *नातं कोणतंही असो* *मतभेद कितीही असो* *संबध तोडण्याची भाषा* *मुळीच कधी करू नये* *प्रत्येक माणूस वेगळा* *विचारसरणी वेगळी* *मनुष्य जन्मा तुझी* *कहाणीच आगळी-वेगळी* *बापा सारखा मुलगा नसतो* *मुला सारखी सून नसते* *नवरा आणि बायकोचे तरी* *कुठे तेवढे पटत असते ?* *जरी नाही पटले तरी* *गाडी मात्र हाकायची असते* *अबोला धरून विभक्त होऊन* *सार गणितं चुकायचे नसते* *काही धरायचं असतं* *काही सोडायचं असतं* *एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून* *एकमेकाला सोडायचं नसतं* *चुकल्यावर बोलावं* *बोलल्यावर ऐकून घ्यावं* *एकांतात बसल्यावर* *अंतरंगात डोकवावं* *राग मनात ठेवला म्हणून* *कोणाचं भलं झालं का ?* *बिन फुलाच्या झाडा जवळ* *पाखरूं कधी आलं का ?* *समोरची व्यक्ती चुकली तरी* *प्रेम करता आलं पाहिजे* *झालं गेलं विसरून जाऊन* *गच्च मिठी मारली पाहिजे* ,*स्वागत होईल न होईल* *जाणं येणं चालू ठेवल पाहिजे* *समोरचा जरी चुकला तरी* *म्हणा खुशाल ठेव देवा त्याला !* *आयुष्य खूप छोटं आहे* *हां हां म्हणत...