मामा ----------------------------- 17/1/2022 ----------------------------- प्रा सुरेखा प्रकाश कटारिया,रांजणगाव गणपती . ----------------------------- काल धनराजजी मामाजी गेल्याची वार्ता कळाली.मन खिन्न झालं. वयाची 88 वर्ष समता धारी मामाजीची ज्योत अनंतात विलीन ....! माझं मन भूतकाळात धावलं...! बाई नेहमी सासरी येताना हुरहुरत्या मनानं डोळे भरून मागे वळून वळून हात वर करुन निरोप देणारी माझी बाई.... माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेली. आई वडील आयुष्यभर पुरत नाही परंतु ते आयुष्यातून सरत ही नाही. अगदी हे खरं असल; तरी सुद्धा तिचे आई वडील गेल्यानंतर माझ्या बाईला जोजवणारे, डोळ्यातले मायचे कड पुसणारे पदमबाई रडू नको. मी आहे ना...! म्हणणारे माझे मामा मोतीलालजी, पन्नालालजी व कालच यांचं निधन झालं ते स्वर्गीय धनराजजी...! खरोखरच मला असं वाटतं *मामा म्हणजे बहीणींच्या अनेक समस्यांना पोटात घेऊन वाढणारी एक संस्था म्हटली; तरी वावगे ठरणार नाही*. कारण जन्मापासून ते मरेपर्यंत मामाच अस्तीत्व आम्हा सर्वांनाच हवहवसं करणार असं होतं. मामा हे दोन अक्षरी भारदस्त शब्द आईच्या गणगोतातील आईच्या सर्वात जवळचं नातं म्हणजे भाऊ आमचे मामाजी... ! ज्या शब्दात दोन वेळेला मॉ या शब्दातील *मा मा अशी पुनरावृत्ती या माॕ च्या मायेच्या दुप्पट माया देणारा म्हणजे मामा* कुशाग्र बुध्दिचे शिवलालभाऊ, समताधारी मोतिलालभाऊ,तपस्वी पन्नालालभाऊ,संयमी धनराज भाऊ,बहीण नावाप्रमाणे शांत शांताबाई, पतासाबाई असा हा बहीण भावाचा परीवार..! या एका वर्षात दोन्ही भाऊ गेले.बहीण गेली. 81 वर्षाची तपस्वी पदमाबाई उदास झाली. ती आदराने त्यांना भाऊ म्हणूनच बोलवायची. बाईच्या प्रत्येक हाकेला धावणारा, बहीणीच्या हक्कासाठी तिच्या सासरच्या मंडळी बरोबर दोन हात करण्याचं धाडस करणार नातं म्हणजे मामा...! हे नातं मनापासून जपणारे मामा सर्वांसाठी महत्वाचे...! मला आठवतंय बालपणात शेतात घेऊन जाणारे ,हुरडा खाण्यासाठी गु-हाळातला रस ,साय प्रेमाने खाऊ घालणारे मामाजी...! आपण वयाने जस जसे मोठे होत जातो. तस तसे आपण बारकाईनं विचार करतो. बालपणात आई बरोबर मामाच्या गावाला जातानाचा तो प्रवास, बैलगाडीचा प्रवास एसटीचा प्रवास, नावेत बसून जाण्याची मजा आणि त्यात मामाजी बरोबर... मग काय...! लहानपणी कोरेगावला गेल्यावर आमचं दुखायला लागलं. रात्री-अपरात्री आरोळ्याच्या दवाखान्यात घेऊन जाणारा मामा...!उषा, पायथ्याशी बसून राहणारा मामा...!! आठवला की मन भरून येतं. मामांनी दिवाळीला घेतलेले कपडे, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शिवलेले कपडे आजही आठवतात. आणि मन आनंदानं भारून जातं. सुट्टीत मामाच्या गावाला गेल्यावर ही *पदमबाईची मुलं म्हणजे आम्हाला आईच्या नावानं ओळखलं जायचं* या प्रश्नाचं उत्तर मला आत्ता उमगतं. अगदी जन्मापासून तो मरेपर्यंत साथ देणारा मामा...!मामाच्या घरची आईला असणारी साडी चोळी तो प्रेम धागा अधिक जिव्हाळा घट्ट करण्यासाठी महत्त्वाचा...! अगदी लग्नात सुद्धा मामा मिळणी झाल्याशिवाय लग्नाचा विधी पूर्ण होत नाही. पुढे मूल झालं की जावळ काढण्यासाठी मामाचं लागतो. सरते शेवटीची साडी चोळी आईला देणारा तो मामाचं...! असा हा मामा आईला जीवात जीव असेपर्यंत साथ देत असतो. असा हा मामा आज आपल्यात नाही.परंतु त्यांचे समताधारी विचार, शांत स्वभाव आणि आयुष्यभर समाधानाने जीवन जगणाऱ्या मामांचा सरळ स्वभावी परिवार म्हणजे दिलीप, बेबी, सुनिता, संगीता, राजू, प्रकाश, अरुण, श्रेणिक, दर्शन सर्व जावई ,पाटोद्याचा नावाजलेला घरंदाज कांकरीया परीवार यांना हा विरह सहन करण्याची ताकत परमेश्वर देवो. विशेष म्हणजे सुनबाई बबीता, पोते, पोत्या, द्वयता सर्वांना हा विरह सहन करण्याची ताकद परमेश्वर देवो. माझ्या मामाच्या आत्म्यास चिरशांती लाभो...ही 🌹भावपूर्ण 😰🙏🙏🙏सुरेखा, बेबी,रविंद्र, उमाकांत व समस्त खाटेर बेनबेट्या व जावई परीवार.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!