[1/6, 5:35 PM] Surekha Katariya: शब्दांचा तोल...!समकालीन मराठी जैन कथा दि.24/12/2021----------------------------- सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33----------------------------- रात्री खुप उशीरापर्यंत झोप लागेना , म्हणून नेहमी प्रमाणे अर्हम प्रणेता उपाध्याय प्रवीण ऋषीजी महाराज साहेबांनी लिहिलेली 'जिनेश्वरी' वाचायला हाती घेतली. तो ग्रंथ आनंदी जगण्यांचा सारं सांगणारा होता. पण तरीसुद्धा वेळेचं, काळाचं भान खूप महत्त्वाचं...!तोल सांभाळायला हवा. ग्रंथ इंटरेस्टींग होता. हातातून सोडवत नव्हता.घड्याळाकडे लक्ष गेलं ... रात्रीचे 3 वाजून गेले होते. नवकार मंत्राचा जप केला. नवकारशीचे पच्चकान घेतले, बळेचचं डोळे मिटले;पण काही केल्या झोप लागेना. या कुशीवरून त्या कुशीवर होत होते. तोच आवाज आला. "हॅलो sss मॕम, ऐकताय ना?" मी बोलते, सायली! अहो, तुमची विद्यार्थिनी ! मॅम तुम्ही लिहिलेले पुस्तक, मला तुम्ही गणितात छान मार्क पडले म्हणून दिलं ते पुस्तक हो...! "ज्याला रडता येत नाही त्याचं नाव बाप..!" या तुमच्या पुस्तकांतील लेखनामध्ये मला माझी आई दिसते . बाबा दिसतात. दोघांची आठवण आली की ते पुस्तक घेऊन वाचत बसते. मनाला खुप बरं वाटतं. जेव्हा जेव्हा अस्वस्थ होते ना; तेव्हा मला या तुमच्या पुस्तकाचा खुप आधार वाटतो मॅम...! ऐकत आहात ना तुम्ही? "हो सायली ...!" "मी तुम्हाला आई म्हणू का?"तिच्या या प्रश्नाने मी जरा गोंधळून गेले.पण स्वतःला सावरत...! अनपेक्षित आलेल्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले, सायली , "हो म्हण ना मला आई..!" लिहिलेल्या त्या लेखनाला, पुस्तकाला ती तिची दाद नव्हती ; तर तिच्या मनाच्या आंतरिक भावनांची साद होती. ती पुढे बोलतच राहिली. सतरा वर्षाची सायली, विद्यार्थिनी होस्टेलला राहणारी. वडीलांच्या अतताई वागण्यांने वैतागून पाच वर्षापूर्वी तिची आई कुठे गेली,त्याचा अध्याप ही तपास नाही.हे मला ठावूक होते. " सारं सारं नको नको झालय मॅम...! जगणं नकोस झालय...!""अगं, काय झालं सायली..?""बाबानी ...! दुसर लग्न ....!! तिला हुंदका अवरेना....!!!" या तिच्या सांगण्यानं डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. बाल्यावस्थेतून कौमार्ऱ्या अवस्थेमध्ये पदार्पण करणारी सायली अक्षरशः जगण्या-मरण्याच्या काठावर वावरत आहे.असं वाटत होत. तिच्या आई बाबांच्या जीवनातील ताणतणाव या बाल सायलीला भाजून काढत असताना, तिची शिक्षीका या नात्याने माझी आवडती चुणचुणीत विध्यार्थिनी म्हणून तिला मी तीला मानसिक,भावनिक, आर्थिक आधार देण्याच्या हेतूने ,जैन समाजाचाच नव्हे तर सर्वांचा जाणता राजा, समाजसेवक विजयकांतजी कोठारी यांच्या ओळखीने सायलीला पुण्यांमधील महावीर होस्टेलमध्ये प्रवेश मिळवून दिला. मी अधून मधून चौकशी करायचे. सायली चिकाटीने शिकत आहे. ठिक...चाललं होतं!पण...! सायलीच्या बोलण्यांने...! माझ्या डोळ्यांपुढे काजवेच चमकले...! मुळ्यांचा आशिष, शहांचा पार्श्व डोळ्यांसमोर आला. कौटुंबिक कलहामुळे त्यांची झालेली वाताहत,मनाला बेचैन करून गेली.शहाचा पार्श्व अतिशय गुणी,हुषार,गायक,संगीत प्रेमी, विदयालयातला बेस्ट आउट गोईंगला स्टुडन्ट,संवेदनाक्षम,तरलबुध्दीचा,निर्मळ मनाचा सर्वांचा लाडका विध्यार्थी, घरात काही ही झालं; तरी फोन करून शेअरींग करणारा.एके सकाळी त्याच्या वडीलांचा फोन, "मॕडम पार्श्व गेला..!संपवल स्वतःला त्यांन...!"प्रंचड धक्का..!! का केलं असे त्यानं..?कित्येक दिवस तो डोळ्यांसमोरून जात नव्हता.अठरा वर्षाचा पार्श्व...!सतत डोळ्यांसमोर दिसतं होता.त्याच्या आठवणीने सारखे डोळे पाझरत होते. मला वाटत होतं, "मी त्या निराशेच्या गर्तेत जाते की काय..?" असा जीवघेणा निर्णय घेण्यापूर्वी त्यांने मला फोन केला असता तर...? तो भारतीय संघटनेच्या विद्यालयातील विद्यार्थी होता. ज्या विद्यालयात साक्षांत मानवतेचे मंदिर उभारले होतं. त्या मंदिरात शिक्षक म्हणून पुजाऱ्याचं काम करणारे आम्ही गुरुवर्य अगदी हतबल झालो होतो. तो माझा शब्द मित्र होता. चांगला वाचक ही होता. मग असं का घडलं...? इतक्या टोकाला का गेला..? एक शिक्षक म्हणून लेखक म्हणून हा माझा पराभवच...! परंतु लगेचच दुसऱ्या बाजूने विचार चमकला."घरा घरातील फक्त पैसा केंद्रित नाते, व्यवहार. आई-वडिलांमधील हरवत चाललेली निष्ठा. पती-पत्नीमधील वाढत चाललेला अविश्वास. एकच ध्यास पैसा! पैसा!! सारं एकसुरी!!! जगताना ना कुठं छंद ना कुठला विरंगुळा फक्त पोटासाठी व्यवसाय,की व्यवसाया साठी पोट असं जगणं...! सतत तक्रारी,नकारात्मक दृष्टीकोन मग असं जगणं त्या जीवन संगीताचं सतार न होता तुणतुणं झाल्याशिवाय राहात नाही. घरातील आजी-आजोबांना कधी जाणीवपूर्वक, तर कधी अजाणतेपणे नातवानं पासून दूर ठेवणे. सुखाच्या फिल्मी कल्पना ,भोंगळ प्रतिष्ठेसाठी संवेदना बोथट झालेल्या पालकांची कर्तव्ये शून्यता...! यामुळेच या चांगल्या गोंडस मुलांना जगणं नकोस वाटाव. जगण्यासाठी, जीवन सुंदर बनवण्यासाठी, जीवनामध्ये पहिलं पाऊल टाकण्याचं जे वय, त्याच वयात जीवनातून, जगण्यातून आणि जगातून काढता पाय घेणारी ही पार्श्व सारखी मुलं डोळ्यां समोरून तरळून गेली. माझं मन अस्वस्थ झालं. सायलीचे ते....! बोलं माझ्या कानात घुमत होते. ती नेहमी मला पत्र लिहायची. एकमेकीणा लिहिलेल्या, पत्राच्या उत्तराची दोघी आतुरतेने वाट पाहायचो. सायली रोज सायंकाळी गाणी म्हणायची. आठवणीत रमायची. भेटलो की मनात साचलेलं सारं उतू जायचं, माझ्याकडे मन मोकळं करायची.मला झोप येत नव्हती.कारण तिचा कालचा तो संवाद मला अस्वस्थ करत होता. नुकतेच जागरणाचे तोटेही वाचनात आले होते. बापरे..! उद्या जाग आली नाही तर...!! शाळेला उशीर होइल .सगळच टाईमटेबल ही कोलमडेल. तोल सांभाळायला हवा. म्हणत.. मी ग्रंथ बाजुला ठेऊन, लाईट ही बंद केली.पण काही केल्या झोप लागेना...! पेज 1[1/6, 5:47 PM] Surekha Katariya: सारखे सायलीचे बोल आठवत होते.बरं का आई मॅडम,"आई गेली हो जग सोडून...! मला आईची आठवण आली, की मला तुम्ही दिसता.विध्यालयात असताना तो तुम्ही फिरवलेला प्रेमळ पाठीवरचा हात, आईच्या स्पर्शाची जाणीव करून देणारा...! आजही आठवतो.बाबांना फोन केलेला ही चालत नाही आई मॅडम...!" तिचं हे बोलणं कानात घुमतं. मला अस्वस्थ करतं. अशावेळी ओम घंटाकर्ण मंत्र म्हणत, मी मनाला शांती मिळावी म्हणून प्रयत्न करत. डोळे भरून येतात. मी एक शिक्षिका, लेखिका शाळेत दिसणारे, समाजात वावरताना येणारे अनेक प्रसंग मनाच्या कुपीत साठवून, लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न, हा कितपत मुलांना उपयोगी पडू शकतो. अशा लेखकपणाचा होणारा विस्तार माझ्या मनाला थिजून टाकतो. या नकारात्मक प्रवासात मार्ग दाखवू शकेल का माझी लेखणी...? कारण असा संवाद मी जर नाकारला तर...!! या कोवळ्या वयात सोबतीसाठी आधार शोधणारी ही मुलं-मुलीं जीवाचं काही बरं वाईट तर करणार नाही ना? अशी मनात भीती वाटत असतानाच फोन वाजला घाईघाईनं फोन घेण्यास उठत असताना सुन्न झाले. तेवढ्यात तिकडून आवाज आला. "मॅडम, तुम्ही सायलीला ओळखता का?""का हो..?""तिच्या मोबाईलवर तुमचा शेवटचा फोन होता म्हणून ...!""हो..! ती माझी विद्यार्थिनी..!""तुमची विध्यार्थिनी सायली! गेली!! स्वतःला संपवलं तिनं" प्रचंड धक्का ...! का केलं तीन असं ..? हा माझ्यातल्या शिक्षकाचा, लेखकाचा पराभवच या विचारातच मी धाड दिशेने पलंगावरून खाली पडले. घाबरून जागी झाले. पहाते तो सायली माझ्या पुढे...! माझे मला कळेना ,सायली ...!पाहून मी तर संभ्रमात पडले.मी स्वप्नात पाहिलं ते खरं की समोर सायली दिसते ते खरं..! मी स्वतःला चिमटा काढला आणि खात्री केली सायलीला जवळ ओढले तिला कुशीत घेऊन ओक्साबोक्शी रडू लागले. सायली मला भयंकर स्वप्न पडलं. भगवान महावीरांच्या कृपेने ते स्वप्न खोटं ठरलं. आणि तू माझ्या पुढे प्रत्यक्ष ठाकली. हा सारा चमत्कार मनोभावे केलेल्या लेखनाचा, शब्दांच्या तोलाचा व घंटाकर्ण मंत्राचा व माझ्या लेखणीतील संवेदनाक्षम, मानवतावादी लेखनाच्या भाव भावनेचा परिणाम...! दोघी एकमेकीच्या मिठीमध्ये...! सायली, मॕमआईचे डोळे पुसत ,"मॕडमआई तुम्हीच तर मला सांगितलं होतं सतत वाचत रहा. आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी जी दिसते ते आपण पेरलेल्या पुस्तकांच्या बियांमुळे ,या पुस्तकांच्या बीजाणं, शब्दांची झाडे आली आणि या शब्दांच्या झाडातूनच डॉक्टरेट पदवीची फळे ही मिळाली. जिद्दीचा दिवा मन लावू तेवत ठेव. तो मालवेल अशा कोणत्याही बाह्य जगाच्या नादी लागू नकोस. सावध रहा.हे तुमचे बोल मला प्रेरणा देत आले आहे. मला आठवतंय तुम्ही दिलेलं ते उदाहरण "ताकाचं मंथन करता-करताच अवचित यात लोण्यांचा गोळा येईल. नुसतं ताक कधी लोणी नसतं.त्यात लोणी आहेच;पण ते मंथाव लागतं. ते मी आपल्या संस्कारान केला आहे. म्हणूनच डॉक्टरेट पदवी मिळवून तुमच्याकडे ही आनंद वार्ता देण्यासाठी, आपले आशीर्वाद घेण्यासाठी आली आहे आईमॕम....! सकाळचे आठ वाजून गेले होते. घरातले सारेजण आजूबाजूला हा संवाद ऐकत होते. मला काहीच सुचेना मी शब्दांचा तोल सावरत निशब्द झाले..!

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!