*स्नेह तीळाचा-गोडवा गुळाचा *14/1/2022 ----------------------------- सुरेखा कटारीया पिंपरी,चिंचवड पुणे 33 ----------------------------- नातं सासू सुनेच असो वा माय लेकीच असो मतभेद कितीही असो शब्दच देतात तिळाचा स्नेह अन् गुळाचा गोडवा शब्द कधी हसवतात शब्द कधी रडवतात तिळगुळाला असले काटे तरी स्नेह तेच वाढवतात...! नातं पती-पत्नीच असो नातं भाऊ बहिणींच असो आर्थिक सुबत्ता असो वा नसो तिळगुळा प्रमाणे जोडण्याची असावी भाषा तिळाचा स्नेह अन् गुळाचा गोडवा फुलवतो प्रेमपाशा आपण सारे घेऊ स्नहेचा वसा...! नातं आजी-आजोबा नातंवाच असो नातं बाप लेकाच असो शब्दरूपी तिळगुळाच्या मंथनान स्नेह रुपी लोण्याचा येतो वर गोळा त्यासाठी एकत्रीत साजरा करा संक्रातीचा सोहळा...! प्रत्येक संस्कृती वेगळी असो प्रत्येक समाज वेगळा असो नात्यागोत्याची वीण आगळी वेगळी असो घरातलं टेलिव्हिजन दूर करतो सर्वांच व्हिजन दूरदर्शी घरातल्या बुजुर्गाचा शब्दरूपी तीळ गुळातील गोडवा ध्येय शिखर गाठण्या सदा वाढवा मग तीळा गुळासारख्या प्रेमपाशात पती पत्नीची मजाच मजा ...!बालपणीच्या बालक्रीडा असो तरुणपणीचं कार्य कर्तुत्व असो काम करताना काही धरायचं असतं सिद्ध होताना काही सोडायचं असतं विचार पटले नाहीत म्हणून एकमेकाला सोडायचं नसतं तिळगुळा सारखं जोडायचं असतं विखुरलेल्या तीळरुपी नात्यांना गुळाच्या चिकटपणान जपायच असतं...! चुकल्यावर बोलणारी असो बोलल्यावर रुसणारी असो एकांतात बसल्यावर अंतरंगात पहात तिळगुळा सारखं आत्म शोधन करायचं असतं चूक कोणाची असो पोटात घालून उदंड प्रेम जपायचं असतं तीळ अन् गुळा सारखी मिठी मारून झालं गेलं विसरायचं असतं तेच तर खरं जगणं असतं हेच संक्रातीचं भाण ठेवण असतं...!*मकर संक्रांतीच्या तुम्हास स्नेह पूर्ण हार्दिक हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक* *प्रा. प्रकाश प्रा. सुरेखा समस्त कटारिया परिवार*💐🌷👌😍🥰🌸😀🌺🌈🏈🏵️🌹🎸🎷🎺🎻

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता