जगणं -कथा -अलक28/12/2021सुरेखा कटारीया- मा.उपप्राचार्या भा.जै.सं.वि.सं.तु.नगर ----------------------------- भारतीय जैन संघटनेच्या विध्यालयातील विद्यार्थिनी प्राची बधाने अनेक वर्षांनी भेटली. कशी आहेस..? जगण्यातील अनेक चढ-उतार सांगताना ती एकदम भावूक झाली. तिचं न बोलणं सुद्धा मला ऐकू येऊ लागलं. म्हणजे सोसलेलं...! ऐकताना स्तब्ध झाले. मला नमस्कार करत सांगू लागली." मॅडम, दुखाच्या क्षणी मला कोणी साथ दिली सांगू..?" मला वाटलं की नातेवाईकांचे नाव किंवा मित्र-मैत्रिणीच नाव सांगेल; परंतु ती म्हणाली, "मॅडम, त्या संघर्षाच्या सर्व क्षणी मला आपल्या शाळेत भोसले सरांनी शिकविलेल्या पेटीच्या सुरांनी व माझ्या गाण्यांच्या आवडीनं ,छंदानं मला साथ दिली. *अलक कथेचं तात्पर्य- *या स्पर्धेच्या युगात ताणमु क्तीसाठी मुलांचे छंद जोपासा*

Popular posts from this blog

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड