*संस्काराचे संस्करण करणारा चिकलठाणचा सुराणा परीवार*दि.10/12/2021पत्रलेखन-प्रा.सुरेखा प्रकाश कटारीया.----------------------------- औचित्य- सेजलचे महाबळेश्वर येथील लग्न...!----------------------------- आ. रीखबभाऊ, लिलाताई ,सुभाषभाऊ, बाळासाहेबांना सुरेखाचा जयजिनेंद्र ..! बहुतांश लग्नाच्या गर्दीत,येणा-याला शोधत शोधत जाऊन बिंद-बिन्नीला शोधाव लागत. हा गाठीशी असलेला अनुभव सेजलच्या लग्नात मोडीत निघाला आणि तो सुखद ठरत गेला. बाळासाहेब आपण भावाच्या बहीणिंच्या मदतीने परीवारात, जीवनाच्या प्रत्येक स्तरांवर समोर येणार्‍या प्रश्नांना वैविध्यपूर्ण विषयांसह हात घालून निर्माण होणा-या परीस्थितीवर मात केली. लग्नाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी लग्न स्थळ महाबळेश्वरपासून ते सेजलची आई मनिषासह ,सुरेखाताई सह , इंद्रजीत उभंयता सह कन्याप्रदान सोहळा लग्नाचा केंद्रबिंदू ठरला...! हे चित्रं अतिशय मार्मिक, अंधश्रधेला फाटा देणारे ठरले . मध्ये मध्ये हौसेनं मिरवणारा पियुष व सुराणांच्या मुलां,मुलीची, सुनांची,जावयांची,भतिजांची,भतिजासुनांची,भांजाची,भांजासुनांची लगबग वाखाण्याजोगीच....! सौदंर्यचं,आपुलंकिचं, आपलेपणाच वैभव, लग्नात दिसत होत. जणू सातही भाऊ ,बहीणी आनंदाने सर्वाचे स्वागत करत होते...! पुढच्या पिढीला छान संस्कारीत केल्याच जणू ते प्रात्यक्षिक सर्वाना पहायला मिळालं. आम्ही जाताच आशोकभाऊ, धिरजनं ,भूषणं,संतोष,कल्पेशा यांनी आम्हा पड माहेरदारचंच; नव्हे तर सर्वांच केलेलं स्वागत मनाला संस्काराची जाण देणार ठरलं. लग्नातील प्रत्येक इव्हेन्ट मग तो धार्मिक असो, सामाजिक असो वैवाहीक असो तो संस्कारमय असून प्रबोधनाच्या अंगाने सर्वांवर सुसंस्काराचे बिजारोपन करणारा ठरला. लग्नातील प्रत्येक विषय संवेदनशील मनाला सांस्कृतिक अदबेसह जुन्या नव्याचा मेळ घालणारा जाणवला. विशेष कौतुक करावे सुराणा परीवाराची शोभा वाढवणा-या शोभा भाभीचे व मनाने,तनाने, धनाने रसिक असणा-या रसिकलालजीचे...! लग्नात स्व. अनिल भाऊची आठवण ठेवत, मनिषाच्या मनाचा विचार करत प्रत्येकाने स्वःताहाला आनंदाने रीप्रेझेंट केले. मनिषाच्या वैचारीकतेचा आलेला अनुभव विचारात घेता.सेजलनं विचारलेला प्रश्न व मनिषानं दिलेलं समर्पक उतर विचार करायला भाग पाडतं. सेजल... मॉ ! शुन्य आणि वर्तुळ एकच ना गं ? " सेजलने भुमितीचे पुस्तक मॉ पुढे ठेवत विचारले . मनिषा समर्पकपणे उतरली. तसे एक दृष्टिने पाहिले तर एकच गं सेजल...! पण शुन्याचा शोध लावणारा महान झाला आणि वर्तुळात राहणारा स्वतः पुरता मर्यादित राहीला. तेव्हा यातला फरक तू स्वतःच समजुन घे बाळा...!जीवन खुप सुंदर आहे ते अधिक सुंदर बनव.लग्न हा आडीच आक्षरी जोडशब्द दोन मनाला, परीवाराला जोडण्याचं काम करतो.याला समर्पन लागतं बाळा...! जीवनाचे मर्म, तत्वज्ञान उलगडून दाखवताना दुर्बोधता, क्लिष्टता कुठेच आढळली नाही; उलटपक्षी सेजलच्या प्रत्येक लग्नप्रसंगात आजपर्यत पेरलेली आत्मीयता, सहजता, सुंदरता,आचार विचारातून व्यक्त होताना दिसली. इतिहासाची कास धरून जळजळीत सत्य पुढे आणणारे, समाजाचे तडकलेले मन मांडणारे, धर्मांधता सोडून,मानवतावादाचा पुरस्कार करताना परीवाराच्या विविध मनोवस्थांची सूक्ष्मता यथार्थपणे टिपणारे; असे अनेक प्रसंग सुराणा परीवाराने सहजतेने हाताळले. म्हणूनच पत्रलेख लिहीण्याचा हा प्रपंचं ...! सर्वांचा आपले पणाचा प्रेमवर्षाव माझ्यालेखी आभाळाची उंची गाठणाराच ठरला! एखादा जवाहीर जसा एक- एक रत्न पारखून घेऊन सुंदरशी, अस्सल रत्नमाला तयार करतो अगदी त्याच प्रमाणे भुवा स्व.जतनबाई व फुप्फाजी स्व.धनराजजी यांनी वास्तवतेच्या प्रभावी संस्काराचं केलेलं संस्करण...! म्हणजे आजचा हा सुराणा परीवार होय....!!संस्कारानं संस्कारीत केलेला हा सुराणा परीवार चिकलठाण सारख्या छोट्या गावातून येऊन पुण्यासारख्या ठिकाणी सुसंस्काराचे संक्रमित करून एकमेकांची मने जपत आहे. हे आमच्या डोळ्यांच्या कॕमे-याने आम्ही टिपले आहे. लग्नात प्रतिभेचं दैदिप्यमान सामर्थ्य अनमोल जीवन समृद्ध करणारं ठरतं हे नक्की! शेवटी आवर्जून सांगेन; बिटीया सेजल, कवरसाहब पिनकिनजी हा ऐवज नक्की ज? पून ठेवा ; आपण गर्भ श्रीमंत आहोत...!!आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक आभिनंदन🥰🌷💐🌈🏵️😍🌸🌺🍁🌹🙏आभिनंदनकर्ता*आपली भाभी* *प्रा.सुरेखा प्रकाश कटारीया मो.नं.9822745030*रांजणगाव गणपती* *समस्त पड माहेरदार*

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!