नाट्यछटा -अनुभव कथन *माझा नसलेला दिवस* -----------------------------.डॉ.श्वेता राठोड.----------------------------- रविवारचा दिवस होता. कॉलेजला सुट्टी होती. घरात मात्र डबल ड्युटी होती. सकाळपासून संध्याकाळ पर्यंत काम आणि काम करत होते. अगदी जीव थकून गेला होता. रात्री झोपायला खूप उशीर झाला. मनाला ठरवुन कशीबशी झोपले . सकाळी लवकर उठायचे घड्याळाचा गजरही लावला.ओजसला सात वाजता शाळेत पाठवायचं होतं.सारं मनाशी ठरवून जरा उशीराच कशीबशी झोपी गेले. झोपी गेले खरी पण काय सांगू जे घडायचे ते घडलं. मला जागच आली नाही.हो घड्याळाचा गजर होऊन गेला असेल. पण मी थकले होते. कशीबशी धडपडत घाईगडबडीनं पावणेसात वाजता उठले. आता कसं होणार..? माझा छकुला डब्या शिवाय जाणार का? या चिंतेनं माझं आईचं काळीज गलबललं. बिस्किट,फळ देऊन त्याला रवाना करण्यासाठी बस स्टॉपला आले.आज बस लेट...!मनात विचार आला का बरं...?आजचा हा दिवस माझ्यासाठी नकाराचा सूर तर घेऊन आला नाही ना? त्याला रवाना करून कशीबशी घरी आले. एकीकडे गॅसवर दूध ठेवलं. भाजी सुधारायला घेतली. तोच फोनची रिंग वाजली. म्हणून घाई घाईनं फोन घ्यायला गेले. तोच दुधाने इकडे डाव साधला. सारं सारं दूध उतू गेलं. माझचं मला कळेना.. मी वैतागले दुधाचा पसारा ,भाजीचा सुधारलेला पसारा आवरता आवरता मी स्वतःवरच चिडले काय हे श्वेता...? तोच शेजारच्या मानसीनं मला आवाज दिला.अगं श्वेता....आज कामवाली येणार नाही गं. हे ऐकताच पुन्हा मला असं वाटलं आजचा हा दिवस माझ्यासाठी नकाराचा सूर.....!घेऊन आला की काय? विचार करत मी कामाला लागले. कॉलेजला जायचं होतं भराभर भराभर सगळी काम उरकली . गाडीला किक मारायला गेले .तो गाडीतलं पेट्रोल संपलेलं. कॉक बाहेर ओढून मी गाडी कशीबशी स्टार्ट केली. आणि पेट्रोल पंपावर गेले खरी; पण पंपावर एवढी मोठी गर्दी...! तिथल्या माणसांशी माझ्या चिडलेल्या मनानं वाद घालून, सुसंवाद साधण्यासाठी, लवकर पेट्रोल मिळवण्यासाठी मी स्त्री आणि पुरुषांच्या दोन रांगा करण्याची सूचना केली व कसबसं पेट्रोल मिळवून गाडीला किक मारली. मनात विचार आला खरोखरच आजचा दिवस माझ्या मनाविरुद्ध वागायचं की काय?असं जणू ठरवून आलायं. गाडीवरून जाताना अनेक विचार करत कॉलेजच्या पायऱ्या चढत असताना, आता प्राचार्य म्हणतील,"या मॅडम आज आपला वाढदिवस वाटतं " मस्टर वर दिसणारा लेट मार्क,लाल अक्षरातला तो एल दिसू लागला. परंतु मास्टर हाती घेतलं सही करायला लागले. सुटकेचा निश्वास टाकत मी लेक्चरला गेले. वर्गात मुले बसलेली त्यांनी गुड मॉर्निंग म्हणून स्वागतही केलं. पण आज माझं मन मात्र अस्वस्थ होतं.आजचा दिवस नकाराचा सुर घेऊन आला होता. आणि दिवसभर काही न काही घडत होतं. विद्यालय सुटलं आणि मी घरी गेले. तोच माझ्या अगोदर कधी न माझ्या अगोदर येणारे माझे पती माझी, दोन्ही मुल आनंद, ओजस घरी..! आज कुलूप उघडावे लागणार नाही..! ओजस घाईने आला आणि माझ्या कमरेला विळखा घालत मला म्हणाला,आई तुझी पर्स इकडे दे. तोच आनंद म्हणाला,"आई थकली आसशील ना गं...! आई चल ये बरं...!! तोच पतीराज म्हणाले, जा हात पाय धुऊन घे. गरम गरम वाफळलेली कॉफी घे. आज थकली असशील ना...! या पतीच्या शब्दांनं, मुलानं केलेल्या स्वागतानं *माझा नसलेला दिवस तिन्हीसांजेला, मावळतीला का होईना माझ्यासाठी खास बनवून आला*. काय हव असता आम्हा महिलांना थोडी शाबासकीची थाप आणि थोडे आपलेपणाची जाणीव. तू थकली असशील ना .? या शब्दांन दिवसभर थकव्यानं थकलेलं मन या काळजीच्या शब्दांन आपलेपणानं, छोट्याशा शाब्बासकिनं" माझा नसलेला दिवस माझ्यासाठी खास बनवून गेला."

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!