नाट्यछटा चौफेर लढताना .----------------------------- डॉ श्वेता राठोड पुणे. ------------------------------अगं आई कुठेस तू ?एक तास झाले मी माझा पेन शोधतोय. वही शोधतोय. रेमेश माझा आवाज ऐकून आईनं "आतूनच आवाज दिला. अरे काय शोधतोय?" मी अगदी केविलवाणं होऊन म्हणालो, "अगं मी वही, पेन ठेवला होता .तो सापडत नाही."अरे आई काय म्हणाली म्हणून विचारतोय ती मला म्हणाली," अरे काल तू अभ्यास करत होतास ना...! अभ्यास करता करता झोपी गेलास. तिथेच तुझी वहि आहे. पेन आहे." "खरंच रमेश,कसं काय आई हे सारं लक्षात ठेवते देव जाणे?""काय म्हणतो? ती आई आहे..! आई आहे...!!" "अरे! आई असली म्हणून काय झालं...? ती माणूस आहे केवढा पाठांतर करावे लागत असेल ना तिला? ती सगळ कसं लक्षात ठेवते. तेच मला कळत नाही?अरे...! हे तर काहीच नाही .प्रवासात कुठे गेलो ना .मी ब्यागेतून साहित्य काढण्यासाठी शोधाशोध करतो. तोच ती वाचत असलेले वर्तमानपत्र बाजूला सरकवून मला म्हणते," अरे ब्यॉगेच्या उजव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला तू ठेवलेली आहे फोनची डायरी ..!" मी तिच्याकडे अगदी आश्चर्याने पाहू लागतो. तर ती पुन्हा वाचण्यात दंग बरं का..!"काय रमेश, मला वेंधळा म्हणतो....!खरंच...!!" रमेश, शाळेच्या युनिफॉर्म बद्दल, माझ्या ठेवलेल्या कपड्यांबद्दल मी विचाराव आणि तीन अलगद सांगाव. बरं का रे ...! कधीकधी अर्ध्या रात्री सुद्धा झोपेत असताना अभ्यास करता करता लिहिलेली पान पंचिंग करण्यासाठी शोधत असताना, प्रखर दिव्याच्या प्रकाशामुळे जागून तिनं विचारावं अरे काय करतोयस?तिची झोपमोड होऊ नये म्हणून काळजी घेत. अगं..! ते पंचिंग मशीन सापडत नाहीये. धड एक वस्तू जागेवर मिळत नाही. तोच तिने झोपेत सहजतेनं म्हणावं अरे.. टिपॉय खाली ठेवलय ना? म्हणजे मी ठेवलेली प्रत्येक गोष्ट तीनच लक्षात ठेवावी. खरोखरच रमेश आई ग्रेटच..!" "काय म्हणतोस? आईचं कौतुक करतो का कधी?" हो रे ..अरे मी शरणागत होऊन आईला म्हणालो, आई दंडवत घालतो तुला. तू ग्रेट आहेस बरं..!" "रमेश तर म्हणते कशी मला..?"" चारी बाजूला लक्ष असावं लागतं बरं का..!" रमेश मला वाटलेलं आश्चर्याची गोष्ट मी सहजतेने लपवण्याचा प्रयत्न करतो. आईला एकदा कौतुकानं विचारावं म्हणतो.आई या सगळ्या वस्तू नेमक्या तुलाच कश्या सापडतात गं...!अरे तेच म्हणायला गेलो तर...!"आई घरातल्या प्रत्येक वस्तूचा आणि तुझा काय गुप्त करार झालाय की काय? " बरं का रे ..!तोच ती मला म्हणते कशी,"आता काय हरवलय तुझं" मी अगदी खजील होऊन म्हणतो, "आई अगं सॉक्स सापडत नाहीत." ती माझा डब्बा करता करता मला म्हणते,"अरे विसरू नयेत, तुला लगेच सापडावे म्हणून तूच गादी खाली ठेवलेत ना? रमेशा काय सांगू माझ्या... माझ्या विस्मृतीच..! "म्हणजे मी विसरू नये. म्हणून तेही मी विसरलेला असतो." केवढी सहजतेन लक्षपूर्वक आईच घरातं वावरण असतं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत नव्हे, बिछान्यात अंग टाकल्यावर ही उद्याचे नियोजन डोक्यात घेऊन आई झोपी जाते.मी तिला म्हटलं आई एकूण एक कसं लक्षात राहतं. आणि मी असा कसा ग वेधळा..?"काय मित्रा तू पण मला वेंधळा म्हणतो, दोस्ता, मला म्हणते, कशी अरे तू घरात असताना ही तू घरात असतोच कुठे? सतत भटकत असतो मैदानावर ,मित्रांबरोबर आणि बरं का आम्ही बाहेर असलो; तरी मनानं फक्त घराचाचं विचार करतो." काय म्हणतो रमेश, घर म्हणजे सिमेंटच्या भिंती नव्हेत. घर म्हणजे घरातलं घर जे मनाला घर देतं, मनाला आधार देतं,असं घर सावरत असताना बाहेर कामाला जाणारी आई घरात वावरत असते. आणि बरं का आपल्याला घडवताना आईची बाई होते. ग्रेटच आहे .चौफेर लढताना सुद्धा "घार उडे आकाशी तिचे लक्ष पिलापाशी...!"खरचं, इथून पुढे ना, मी माझी कामं लक्षपूर्वक करेल. चल येतो .आई आवाज देती रे मला...

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!