युवाचार्यजी नमन🙏गुरु एक जगी त्राता संस्कृत मध्ये इतकं सुंदर वचन आहे.*"हुरवू रुष्टे गुरुह त्राता गुरुह रुष्टे न कष्ट "*हरी रुसला तरी काळजी करायचं कारण नाही. कारण गुरू आहे आपल्या पाठीशी. गुरु रुसलात तर पंचायत; म्हणून गुरु जगी एकच त्राता....! भूतकाळाचा दुवा भविष्यकाळाचा दिवा म्हणजे गुरु! जो लघु नाही तो गुरू!! जो लघुला सुद्धा गुरु करतो तो खरा गुरू!!! जो ईश्वराचं गुप्त रूप जो दाखवतो. तो गुरू. दत्तगुरूंनी तर चोवीस गुरु केले. जे स्वतः साक्षात सतगुरु होते. त्यांनी चोवीस गुरु केले. त्यांनी आम्हाला एवढाचं संदेश दिला. स्वतःकडे लघुत्व घेतलं की समोरच्यातलं गुरुत्व आपोआप दिसतच..! फक्त त्यासाठी ती दृष्टी उघडणारा गुरु कोणी तरी पाठीशी असावा. तो आम्ही आपल्यात पहातो युवाचार्यजी कारण प्रत्येकामध्ये शेवटी भगवंताचं रूप असतं. त्या रूपामध्ये जे जे भेटे ते ते मानिजे भगवंत. ही विचारसरणी फक्त आपल्या मनामध्ये रुजवणारे आपणच गुरु आहात...🙏 . कबीरजीनी एका ठिकाणी असं म्हंटलं आहे. माझ्या घरी गुरु आणि देव एकत्रित आले. तर मी पहिला नमस्कार कोणाला करावा?*गुरु गोविंद साथ खडे काके लागू पाव* ते प्रश्न विचारून थांबत नाहीत. कबीरजी त्याला उत्तरही देतात. ते म्हणतात, "बलिहारी गुरुजी आपने गोविंद दिजो बताये. गुरुजी पहिला नमस्कार आपल्याला कारण माझी एवढी योग्यता नाही. आपण आहात म्हणून हा भगवंत माझ्या दारी आलेला आहे. त्यामुळे ही सरस्वतीची आराधना करू शकतो .त्यामुळे पहिला नमस्कार गुरुयुवाचार्यजीना व आदी ठाणा संत संतियाना.म्हणूनच सरस्वतीची आराधना करून हा स्वारस्वताच्या दरबारी ओमकाराचा हुंकार *गुलुगुलु बोलूया* पुस्तकातून उमटला आहे.ही सारी आपली प्रेरणा आहे.आपण गुलगुले बोलू या लेखन रंग पुस्तकासाठी दिलेले आशीर्वचन फार मोलाचे आहे. हा तुमचा शब्दरूपी आशीर्वाद महत्वाचा असून पुढील साहित्य प्रवासासाठी महत्त्वाचा आहे.श्राविका 🙏🙏🙏सुरेखा प्रकाशजी कटारीया चिंचवड पुणे.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!