आपटा30/10/2021----------------------------- सुरेखा कटारीया----------------------------- दसऱ्याच्या दिवशी पाहिला माझ्यावरचा घाव..सांगत सुटलो हे मानवामाझ्यासाठी तूच धाव...गावोगावी फुललं होतोहिरवा हिरवा गार.. मोहरून आलो जणू पेलतो नऊ महिन्याचा भार...प्रेमाने तुम्ही पहात होताहे पैशाचे झाड..दसरा आलाअन् माझ्यावर पडली धाड ..मला आता आनंदानेजगू द्या ना रे...येता दसरा सारे विसरा मला तोडण्या सरसावून नका रे...मी तर पर्यावरणाचा आहे रक्षक...कार्बन डायऑक्साईडचा हो मी भक्षक...आपण तर देता मज मान ...पर्यावरण राखण्यात ठेवा भान ...सोने सोने म्हणत घालता घाव...दुसर्या दिवशी नसतो कसला भाव... बदला आता काळासवेकरु नका निचरा... नका करू तोडुनी हा माझा असा कचरा...अंधानुकरण नका करूनव्या विचाराने तरु...घेईन मोकळा श्वास पर्यावरण गुरु... कुविचारांचा करून पराजय... आपटा लावून दसऱ्याचा करू विजय...प्रा सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 33

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण