*शिकवण मुंग्यांची* 17/9/2021 सुरेखाकटारीया .----------------------------- एकदा मुंग्यांची भरली शाळा भराभरा त्या झाल्या गोळा... त्यांना नव्हते गुरुजीं ना बाई शिस्तीने रांगेत जाण्याची घाई... कुणाला ही मागे रेटत नव्हत्या कुणाला ही पुढे ढकलत नव्हत्या... प्रत्येकिच्या तोंडात मातीचा कण कणकण मातीचा मनभर ढिगारा... ढिगार्‍याच्या वारूळ लागल्या राहू तोंडात गोळा करी कणकण गहू... आळस त्यांना ठाऊक नव्हता थकवा त्यांना माहितच नव्हता... कोणाशी उगाच बोलत नव्हत्या रांगेत शिस्तीनं चालत होत्या... त्यांना ना जात ना भेद फक्त धर्म मुलांनो, मुंग्या सारखं आपण करू कर्म... समजून घेऊ आनंदी जगण्याचं मर्म समजून घेऊ आनंदी जगण्याचं मर्म ....

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण