सात पिढ्याकाय सांगू कसं सांगू कोरोना नको तू आता अंत पाहू काय करावं कसं करावं माझं मलाच कळेना अन् कळल तरी वळेनामला चांगलंच आठवतंय वाडवडील म्हणायचे सात पिढ्या बसून खाऊ इतकी आसामी आहे नको त्रास करून घेऊ आपण घरात बसूनच खाऊ...मला असं वाटतं त्यांनी सांगितलेलं आता खरं ठरत आहे आपलीच ही सातवी पिढी लॉक डाऊनमध्ये बसून खात आहेकाय सांगू बाहेर कोरोना घरात करमेना काय करावं उमजेना किती ही जीबी नेट घेतला तरी पुरे ना मलाच काही समजेना..किती सांगू कसं सांगू काही समजेना झोपल्या नंतर जेवण की जेवण करून झोपावे काय करतोय उमजेना माझं मलाच समजेना..आधी नाश्ता.. की आधी आंघोळ.. झोपावं.. की वाचाव., तेच कळेनाकाय करतोय तेच उमजेना माझं मलाच समजेना..झोपेतून उठलो आहे की झोपायला जायचं आहे व्हाट्सअप उघडायच का फेसबुक पाहायचंय काय करावं ते उमजेना माझं मलाच समजेनाबातम्यात कोरोना वर्तमानपत्रात कोरोना आत कोरोना बाहेर कोरोना काय करावं माझं मला उमजेना काय करावं समजेनाकविता करताना माझं कवित्व जागं झालंय की.. डोक्यावर परिणाम झालाय ? तेच उमजेना माझं मलाच समजेना..काय सांगू कसं सांगू माझ मला कळेना कोरोना तू जा आता नको सर्वांचा तू अंत पाहू तू गेला कि आनंदाने गाणे गाऊ..सुरेखा कटारिया पिंपरी चिंचवड पुणे.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!