*समकालीन मराठी जैन कथा* *आम्ही विश्व लेखिका आयोजित कथा उपक्रम* *कथा - सचोटी* ----------------------------- लेखिका-प्रा. सुरेखा कटारिया. चिंचवड पुणे. ----------------------------- विचार फक्त सत्कर्माचा केला. सकारात्मकतेचा केला; तर आभाळही साथ देतं... उद्योजिका शोभाताई धाडीवाल यांनी दिलेला मदतीचा हात, माझा पुरुषार्थ, जिद्द, कामाची सचोटी यामुळे माझ्यात असणारी कलाकारी प्रकाशात येऊ लागली...एकेक दालनं उघडत गेली.. फावल्या वेळात मुलांच्या व सासू-सासरे यांच्या मदतीने पणत्या केल्या.पूजेच्या थाळ्या बनवल्या, गणपतीच्या आरासाचे साहीत्य बनवले, कंदील बनवले. सामायिक करण्याच्या बेटक्याच्या पिशव्या बनवल्या, पुजन्या बनवल्या, जपाच्या माळा बनवल्या. छोट्या मोठ्या प्रदर्शनात कला प्रदर्शित केल्या...या सर्वांबरोबर भारतीय जैन संघटनेत साक्षरता वर्ग चालवले..अनेक महिलाना लिहायला, वाचायला शिकवीलं... मेहनतीनं जीवनाचा आलेख उंचावत गेला....एकेक पायरी चढत गेले. टीव्हीवर चाललेली समृद्धीची मुलाखत जीवनाला त्रासलेली तिची बाई सारिका व मावशी लतिका ऐकत होत्या. आज लघुउद्योग करते. या माध्यमातून हजारो गरजू महिलांना रोजगार मिळवून देत आहे...प्रश्न- आपण पीडित महिलांना रोजगार निर्माण करून दिला.हे आपण कसे साधले? या विषयी थोडस सांगाल. मी एक पीडित महिला मला जे सोसावं लागलं. भोगावं लागलं. त्या त्रासाची दाहकता कमी करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिले. मला माझ्या जगण्याच्या कलेनच जीवदान दिलं... "नवरा न सांगताच निघून गेला असला तरी या काळोखातली मेणबत्ती होऊन आपले कर्तृत्व सिद्ध करून प्रकाशित प्रकाशाने हळूहळू जळू उजळू लागले.संकटांशी टक्कर देउन जगण्याची उभारी आली.दार बंद झालं तर खिडकीतून दिसणार आकाश मला खुणावत होतं.हा विश्वास कृतीतून साकारला . कारण करत असलेली जिनवाणीची सेवा, एकाग्र ध्यानातून, कधी निरपेक्षपणे गुरु महाराजांच्या सत्संगती तून तर कधी अभिजात संगीताच्या भक्ती गीताच्या श्रवणातून तर कधी भगवान महावीरांनी सांगितलेल्या उत्तराध्याय सूत्राच्या शिवालयातून तर कधी तुकाराम महाराजाच्या अध्यात्मिक बैठकीतून! खूप अधिक शांत चिरंतन असं काही हातून घडण्याची तयारी आपोआपच...!" आत्मविश्‍वासाने बोलणाऱ्या समृद्धीचे डोळे पाणावले. समोर बसलेल्या श्रृतूवृंदानी टाळ्यांचा कडकडाट केला. समृद्धीची मुलाखत चालू होती.. मुलाखतीचा शेवटचा प्रश्न मुलाकात कार श्रीकांत चौगुले यांनी विचारला,"समृद्धीताई आपण प्रतिकूल खडतर असा प्रवास करत असताना हे आपलं घवघवीत यश आणि अनेक महिलांना उभा करण्याची ऊर्मी ताकत आपण कशी मिळवली हे आम्ही ऐकलं; माझा शेवटचा प्रश्न "तुम्ही या आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल?" "मी फारशी शिकलेली नाही, परंतु एवढेच सांगेन जीवनात किती ही कठीण प्रसंग येऊ द्यात .या प्रसंगांना सामोरे जाताना या स्पर्धेच्या युगात दुसऱ्याला मागं टाकण्याच्या अगोदर स्वतःला गाठण्यासाठी आवश्यक ती स्वतःची बैठक असायला हवी. आणि हा स्व एकदा स्वःताहाला भेटला, मिळाला की मग लक्षात येतं कोणी पुढे नाही. कोणी मागे नाही. आपण जरी गर्दीत असलो; तरी श्वास एकट्यालाच घ्यायचा असतो.जगणं एकट्याच असतं; पण ते जगणं सर्वांना उपयुक्त होण्यासाठी कार्य करणं महत्त्वाचं आणि त्या ही पुढे जाऊन सांगेन कोणत्याही कठीण प्रसंगी आत्महत्याचा विचार न करता आत्मचिंतन करून जीवन जगण्याचा कासरा धरा.. जीवन खुप सुंदर आहे.ते सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अधिक सुंदर करा" ही मुलाखत सुरू असतानाच नवऱ्याच्या त्रासाला वैतागलेली सारिका लतिका एकमेकीकडे पाहू लागल्या. लतिकाने सारिकाचा आपला हात हाती घेते तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले.----------------------------- शब्दांचे अर्थ----------------------------- *उत्तरा ध्यानसूत्र- जैन धर्मातील बत्तीस आगमापैकी एक आगम ग्रंथ *सामायिक- 48 मिनिटांसाठी केलेली ध्यानधारणा*पुंजनी- सामायिक करते वेळी जीवदया साठी वापरली जाणारी सुताच्या दोऱ्याचा बांधलेला कुंचला.बेटके -ध्यानधारणेसाठी बसावयाचे आसन.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!