समकालीन मराठी जैन कथा आम्ही विश्व लेखिका कथा उपक्रम *कथेचे नाव- फुलसवे माती गंध* ----------------------------- लेखिका-प्रा सुरेखा कटारिया चिंचवड, पुणे.दि.17/8/2021----------------------------- पहाटेचे पाच वाजून गेले होते. नेहमीप्रमाणे सुजाताबेन उठल्या होत्या. कित्येक वर्षांची सवय होती त्याची. उठून आपले दोन्ही तळवे डोळ्यासमोर पकडून चोवीस तीर्थंकरांना नमन करू, धरणी मातेला नमन करून सामायिक होईपर्यंत नवकारसीचे पच्चकान येईपर्यंत आठ वाजून जायचे.मगच तोडात पाणी घालत. आज ही तोच नियम! सामायिक ठिकाने केली की तोंड धुवेपर्यंत स्वानंदी चहाचा कप सुजाताबेन समोर आणून ठेवी. पण आज स्वानंदीचे चित्त थाऱ्यावर नव्हते. चेहरा त्रासलेला होता. दरवाजात उभी राहून सारखी दूर वर काहीतरी पाहत होती. " आज काही दूध पाणी मिळणार आहे का नाही? अगं! दिवस उगवताच कोणाच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहेस स्वानंदी ?अगं,तुझ्या पोटच्या मुलानं एवढ्या विनंत्या केल्या आजिजी केली. तेव्हा गेली नाहीस त्यांच्याबरोबर!आणि हो भारत माता..! भारत माता...! करत नवरा ही सीमेवर लढता लढता गेला. आता एक मी नंनदच उरली आहे तुझ्या सोबतीला.... मला ही अशीच मारून टाक. म्हणजे झालं..... ठेव उपाशी...." सुजाताबेनने तोंडाचा पट्टा चालूच ठेवला; पण स्वानंदीने एक शब्द न बोलता तशीच दाराच्या समोर उभी राहिली होती. तिच्या अशा या थंड वागण्याने सुजाताबेन च्या रागाचा पारा चढला. तळपायाची आग मस्तकाला पोहोचली. तशातच पहिल्या दिवशी केलेला चौविहार व आता नवकर्सी येऊन गेली. तरीसुद्धा पाण्याचा थेंब पोटात नाही. भूक लागलेली या भुकेनं त्या अधिकच तडतडल्या. आणि तिच्यावर कडाडल्या, " स्वानंदी तुझ्याशी बोलते मी?अगं कान फुटले का? बहिरी झाली आहेस. कुठला तो अनाथ पोटा.... ! त्याच्यासाठी जीव कासावीस करतेस? आणि तुझ्या रक्ताच्या नात्याच्या बायसा दूध, पाण्यावाचून तडफड करत आहे, त्याचं काही कसं वाटत नाही गं तुला ? काय संबंध तुझा त्याच्याशी? ss बोल ना?अनाथ पोट...! त्याच्यासाठी वाटेल ते करायची तुझी तयारी.... त्याचे लाड.... त्यासाठी गोड-धोड करणार. त्याच्या आवडीचं बनवणार. त्यांन कधीही रात्री-अपरात्री यावं. धडाडधूम दार उघडावं. सारा झोपेचा सत्यानाश. पण तु त्याला काय गरम करून देतेस. रात्री अपरात्री खायला काय घालतेस. आपल्याकडं दिवस मावळल्या नंतर चौका बंद असतो. तरीसुद्धा सगळे नियम बाजूला ठेवून त्याच्या साठी काहीही करायला तयार असतेस. आजून तो आलाच नाही. कुठं गेला कोण जाणे?"बायसा तो सीमेवर ....!ही सांगता सांगताच स्वानंदीची डोळे भरून आले. रस्त्याला डोळे लावून बसलेली स्वानंदी बरसली. ओक्साबोक्शी रडू लागली भारत मातेच्या चरणी हुतात्मे आलं हो माझ्या अभिनंदनला तेवढ्यात मिलेक्ट्री च्या गाडीमध्ये त्याचं पार्थिव समोर आलं आणि स्वानंदीने दत्तक घेतलेल्या अनाथ मुलाच्या पार्थिवा समोर शपथ घेतली इथून पुढे तुझं राहिलेलं अपूर्व काम मी पुर्ण करेन व देशासाठी भारत मातेसाठी तिच्या रक्षणासाठी सज्ज राहील आणि ती लष्करामध्ये भरती झाली धन्य ती स्वानंदी व धान्य तिचा त्याग! म्हणतच सुजाताबेनने ही स्वतःला देश सेवेसाठी समर्पित केले. फुलासवे मातीस गंध!

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!