औंदा वारी नाय ५/७/२०२१ बिठूराया भाव हाय भक्ती हाय,पण वारी नाय आवंदा मनातली भक्ती अर्पू रंss कुणाला आरंss या कोरोनान आम्हा समद्यास्नी आणलंय जेरीला.. मनातल्या भक्तींभावाचं लेणं, विठ्ठला वाहू कसं रंss तुला? तुच सांगा लॉकडाउनच्या काळातही, कसंss आमी यायचं वारीला... काय करू विठूराया औंदा वारी केली घरच्या घरी, पण विठ्ठला तूच की रंs दिसला आम्हास्नी डॉक्टरांच्या अंतरी बरं का, नव्हता चंदनाचा लेप पण पाहिलं आम्ही तुला पीपी किट घालताना अन् कोरोना ग्रस्तची काळजी घेतं फिरताना कोरोनानं हतबल झालेल्या भक्तांना तू सावरताना...थरमल गन घेऊन ऑक्सी मीटर लावून रेमडीसीव्हर देवून जीवदान दिलं पुन्हा जाण्यास पंढरीला एवढेचं नव्हे तर बा विठ्ठला हजेरी लावली तू खाक्या वर्दित पोलिसांच्या गर्दीत कमरेवराचा सोडून हात रुखुमाईला घेऊन साथ म्हणंss तू चालवली ऍम्ब्युलन्स भक्तांसाठी दिनरात... एवढ्याश्या विषाणूनं थांबवलं जगाला पण तू मात्र मास्क घालून अंतर ठेवून सावरलं कोरोना ग्रस्त भक्तांना कुणाची आई गेली कुणाचा बा गेला, बा विठ्ठला त्यांचा तू माय बाप कि रं ss झाला हे कसं सांगू कुणाला...अरंssयुगे अठ्ठावीस उभा विटेवरी किती जागतो रे भक्ताच्या भक्तीला लावून व्हक्सीनचा शोध संशोधकांमध्ये अवतरला शोध लावून लसीचा पुढच्या वर्षी वारीला जाण्यास सावरलं परिस्थितीला आता एकच मागणं विठुराया मिटव हा कोरोना वारीत नको आता लॉकडाऊन कसलं अंतर अन् भेदभाव ज्ञानबा तुकारामचा गजर करत करत भेटव उरा उरी पंढरपुरात भक्तांना... सुरेखा कटारिया ,चिंचवड- पुणे.

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण