*पिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित.....**"विनंती विशेष" पत्र लेखन**पत्र : १० वे* *सोमवार दिनांक : १९ जूलै २०२१* *विषय : रखुमाईला पत्र "*माय माऊली रखुमाई आपणास शतकोटी वंदन वि. वि.आज मोठी एकादशी! एकादशी निमित्त आपल्या मध्ये असणारा करुनेचा भाव आमच्या ही अंतरी संसार करताना महत्त्वाचा !! कोणतेही सत्कृत्य करण्यासाठी आपल्या मनामध्ये करुनेचा भाव खूप महत्त्वाचा कारण साक्षांत रखुमाई आपण आमच्या श्रद्धास्थान आहात. आले होते तुझ्या दर्शनाला तेव्हा तुलाच विचारलं होतं "रखुमाई विठ्ठलाला पाहिलं का गं तू?"तेव्हा म्हणालीस,"अगं तो जरी माझ्यापासून दूर असला;तरी तो माझ्या मनाच्या रोमारोमात आहे दाखवू का तुला?"क्षणाचाही विलंब न लावता मी म्हणाले, "रखुमाई दाखव गं माझ्या बा विठ्ठलाला!" रखुमाई तू सांगितलेलं जसं ची तसं माझ्या हृदयावर कोरले गेले. त्या बा विठ्ठलाचं आणि तुझं रूप डोळ्यात साठवून जगत आले. तेव्हा तू मला म्हंटली होतीस," तु जर ध्यान मग्न होऊन त्यांच्याकडे पाहिलं, की तुला अनाहत चक्राशी मोठे निळे विष्णु पद जाणवेल बरं. छातीवर भृगू ऋषींनी मारलेल्या लाथेचा अंगठा रुतल्याचे चिन्ह आहे.त्या चिन्हात पिवळा प्रकाश जाणवला मला आजही तो जाणवतो.डोक्यावर असलेल्या शिवपिंड भोवती पांढरा प्रकाश जाणवतो गं रखुमाईविठोबाची महापूजा बघतांना मला त्याच्या अंगावर असलेल्या खुणा प्रत्यक्ष बघायला मिळाल्या ; परंतु विठोबाची मूर्ती माझ्यापासून काहीशी दूर असल्याने.... तेव्हा रखुमाई तुझ्या सान्निध्यामुळे मला आगळावेगळा अनुभव अनुभवायला मिळाला तो तुझ्या अवधी ज्ञानानं, तुझ्या मनपर्याप्त ज्ञानानं मला मिळालेला तुझा सहवास अविस्मरणीय अलौकिक असाच वाटला आणि विठुरायाच्यागळयात कंठाशी असलेला कौत्सुभमणी लाल प्रकाशाने न्हाऊन निघालेला दिसला रखुमाई तो तुझ्याच मुळे.मकराकार कुंडले पिवळया रंगाच्या प्रकाशाची जाणवली.कटीवर ठेवलेल्या एका हातात असलेला शंख निळा, तर दुसर्‍या हातातील कमळ लालसर रंगाचे जाणवले.रखुमाई तुला बसण्या साठी असलेल्या चंद्राकृती जागेत लाल रंगाचे शक्‍तीतत्त्वाने मी भारावून गेले.कमरेला असणारा वासुकीच्या दोर्‍याचा विळखा संपूर्णत: पिवळया प्रकाशाचा त्यातून अनेक चैतन्यलहरी वायूमंडलात प्रक्षेपित होताना या कोरोना सारख्या महामारी मध्ये सुद्धा तू प्रत्येकाच्या मदतीला धावून येत होता. एवढेच नव्हे; तर नाभी मध्ये सरस्वती तत्त्वाचा वास जाणवून तेथे पांढरे कमळ जाणवले. या कोरोना काळामध्ये अनेक लेखक लेखिका लिहित्या झाल्या. दोन पायांच्या मधे असलेल्या काठीमध्ये कृष्णतत्त्व जाणवून त्या काठीतून प्रक्षेपित होणार्‍या लाल रंगाच्या मारक लहरी पाताळा पर्यंत जात असल्याचे व विठोबा एकाच वेळी ऊर्ध्व लोक व अधो लोक यांवर नियंत्रण ठेवत असल्याचे जाणवले. विठोबाच्या उजव्या पावलावर मुक्‍तकेशी दासीच्या हातांची बोटे रुतलेला ठसा तू मला दाखवला. मुक्‍तकेशी दासीला तिच्या रूपाचा खूप गर्व होता. तिचे गर्वहरण करण्यासाठी पांडुरंगाने अतिशय सुकुमार रूप धारण केले व ते एवढे कोमल होते की, मुक्‍तकेशी त्याच्या पायाला हात लावून दर्शन घेतांना तिच्या हातांची बोटे पांडुरंगाच्या पावलात रुतली. त्या ठशात लालसर शक्‍तीप्रवाहाचा बिंदू जाणवला. अशा प्रकारचे अनेक अहंकार या महामारी मध्ये पुसट झालेले दिसतात रखुमाई हे सार मला आठवतंय!विठोबाच्या पायाखाली पुंडलिकाने पांडुरंगाला उभे रहाण्यासाठी फेकलेली वीट आहे. त्या विटेतून दाही दिशांना चैतन्याचे झोत पसरून सारी सृष्टी पुन्हा एकदा नव्याने जगण्यासाठी तत्पर राहील असं विठ्ठलाच्या व रुक्माई आपल्या सहवासामुळे शक्य आहे.मन शांत होता पुन्हा लागे ओढlविठ्ठल रुक्माईची अतिसुंदर जोड llरखमाई खूप लिहीत बसले, किती लिहिले तरी लिहावच वाटतं.तुझीच श्रद्धाळू भेटी लागे जीवा म्हणणारी, सुरेखा .सुरेखा कटारिया चिंचवड पुणे 9822745030

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!