*जय जिनेन्द्र*🙏🙏🙏 *आज शंकरभाऊ मुथा अर्थात आपणा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे भाऊ ! जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी*!!*यांचा आज स्मृतीदिन*! खरोखरच वेळ हळूहळू निघून जाते. जीवन आठवणींचे पुस्तक बनून राहते. आठवणी मोरपिसा सारख्या मनामध्ये घर करून राहतात भाऊ!निरंतर माळेतून एक मोती गळून जातो आणि त्यामुळे त्यांची उणीव कोणीही भरून काढू शकत नाही असे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे भाऊ!शरीर उंच असो, बुटके असो सुंदर असो वा नसो. शब्द सुंदर असले पाहिजेत ते स्वकर्तृत्वानं कोरले पाहिजेत. कोरलेले शब्द हृदयी बसले पाहिजेत. बसलेल्या शब्दाने हृदय जिंकले पाहिजेत.आशी अनेकांनच्या हृदयावर आपल्या पुरुषार्था ने अनेकाची जिंकलेली हृदय !आज ही त्या भाऊंच्या आठवणींनी गदगदून भरून येतात अनेक हृदये. भाऊंच्या अनेक स्मृती चित्रपटासारख्या डोळ्यासमोरून जातात. त्यांच तात्विक जगणं, मनुष्याची घडण करणे. आणि माणूस म्हणून जगण्यासाठी त्याला प्रेरित करणं, या साऱ्या गोष्टी भाऊ आम्ही आपल्याकडून शिकलो .आज आपण या जगात नाहीत; परंतु आपली प्रत्येक कृती, प्रत्येक स्मृती आम्हाला व श्री. जैन विद्या प्रसारक संकुलनाला जीवन जगत असताना मार्गदर्शन करते. आशा भाऊंचा आज स्मृतीदिन या स्मृति दिना निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !🙏🙏🙏 आपली स्नेहांकित प्रा. सुरेखा, प्रकाशजी कटारिया स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स परिवार नवी दिल्ली

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!