म स प पिं .चि. आयोजित सरीवर सरी या आयोजित उपक्रमात पहिला पाऊस ही कविता पाठवीत आहे.दि.12/7/2021*पहिला पाऊस*लग्न होऊनी सासरी येता मज आठवला तो पहिला पाऊसपावसाच्या बरसती अंगावर सरीवर सरीआठवणींचा पारिजात बहरी गं माझ्या अंतरी तो तुझा स्पर्श आज ही अंग शहारीराजसा आज ही पावसाचा थेंब बनून तू येशी माझ्या अंतरी....पहिल्या पावसाच्या सरीवर सरी माझे अंगण भरीथेंब थेंब बनुनी तू आला माझ्या दारीपावसाच्या थेंबानं सृष्टी बघ बहरलीराजसा आज ही पावसाचा थेंब बनवून तू ये माझ्या अंतरी....थेंबा थेंबातलं गुढ जेव्हा सर्वांना समजलंथेंबाचं थेंबाशी नातं काय असतं ते उमजलंथेंबातून झाली निसर्गाची निर्मीतीराजसा आज ही पावसाचा थेंब बनून तू येशी माझ्या अंतरी....थेंबाचं मर्म जेव्हा नदीला कळलंथेंब होण्यास नदी सागर मेघाकडे वळलंविरहाने मला छळलंराजसा आज ही पावसाचा थेंब बनून तू येशी माझ्या अंतरी....सुरेखा कटारीया चिंचवड पुणे 33मो.नं9822745030

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण