*रखुमाईचा गुलदस्ता* दि.१/७/२०२१ ------------------------------ विठ्ठला आठव तुझा रे येताच बसले बरं पत्र लिहायला तुला शब्दांचा गुलदस्ता घेऊन आज भेटायला आली ही रखुमाई तुला मम मनात सुखद आठवणी भाव भावनांच्या रे संवेदना पत्रात लिहीते भक्तांच्या शक्ती जनक जीण्यांच्या खानाखुना विठ्ठला किती लिहिलं तरी शब्द अपुरे मन कसं भरलेलं जगताना क्षणोक्षणी तुलाचं भेटायला मन माझं आसुसलेलं धीर कसा काय रेsss धरू प्रसंगाचं ठेवू कsssसं भान सरळ चाल तरी आडवे फार हा तुझ्यामाझ्यातला घर्षणसारं मम लाडक्या विठ्ठ्या तुझी आठवण सतावते फार म्हणून बसले तुझ्यासाठी शब्दांच्या गुलदस्त्यांचा घेऊनी रे हार सौ सुरेखा प्रकाश कटारिया चिंचवड पुणे

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण