मुक्तछंद काव्य रचना जगणं रीचार्ज बोलण्यातला अबोला संपला असेल तर सायलेंट मोड दूर करू पुन्हा एकदा टॉकटाईम टाकून बोलन आपलं सुरू करून आनंद फॉरवर्ड करू चला ना पुन्हा जगणं आपलं रिचार्ज करू... आपुलकीचा नेट पॅक मारून गैरसमज डिलीट करू समजुतीच्या बॅलन्सनं प्रेमाचं व्हावचर स्क्रॅच करू गोड स्मृतींच्या पाऊल खुणा मनाच्या मोबाईल मध्ये सेव्ह करू चला ना पुन्हा जगणं आपलं रिचार्ज करू... आपुलकीचं नातं अपलोड करू जर आला दुःख दुराव्याचा व्हायरस तर प्रेम स्नेहाचा अँटिव्हायरस भरू नकारात्मक विचारांचा फॉरमॅट मारू पुन्हा जगणं आपलं रिचार्ज करू... , जगण्याचे आनंदी क्षण सेव्ह करू दुःख दुराव्याला डिलीट करू लोss होणारी आयुष्याची बॅटरीआनंदी क्षणाने स्वःतच चार्ज करू चला ना पुन्हा एकदा जगणं रिचार्ज करू... मुलांमध्ये सुसंस्कार पेरत जाऊ मुलांसाठी संपत्तीचा डेटा कशाला साठवू मी काय सहन केलं कशाला आठवू मुलांना कुणाची कॉपी करण्यास का पाठवू सकारात्मकतेची सेल्फी त्याच्या डोक्यात भरू चला ना पुन्हा जगणं आपलं रिचार्ज करू... फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सऍप ट्विटरवर अपडेट आपण राहू शेजाऱ्यांचं दुःख पाहून त्यांना मदतीचा हात देऊ सर्वांचा जगण्याचा जीबी डाटा वाढवत राहू चला ना पुन्हा जगणं आपलं रिचार्ज करू... मोबाईल समृद्धीसाठी विविध एप वाढवत राहू लाईकस नाही मिळाले तरी नातेसंबंध टिकण्यासाठी सुसंवाद साधत राहू नेट पॅक संपला तरी नात्यातला गोडवा वाढवत राहू आपण सारे फोटो काढताना हसतो तसे हसत राहू चला ना पुन्हा एकदा जगणं रिचार्ज करत राहू... सुरेखा कटारीया चिंचवड पुणे.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!