पहिला पाऊस मज आठवतो तो पहिला पाऊस पावसाच्या बरसती अंगावर सरीवर सरी आठवणींचा पारिजात बहरी माझ्या अंतरी तो तुझा स्पर्श आज ही अंग शहारी राजसा आज ही पावसाचा थेंब बनून तू येशी अंतरी.... पहिल्या पावसाच्या सरी माझे अंगण भरी थेंब बनुनी तू आला माझ्या दारी पावसाच्या थेंबानं सृष्टी सुध्दा शहारली राजसा आज ही पावसाचा थेंब बनवून तू ये अंतरी.... थेंबा थेंबातलं गुढ जेव्हा सर्वांना समजलं थेंबाचं थेंबाशी नातं काय असतं ते उमजलं थेंबातूनच झाली निसर्गाची निर्मीती राजसा आज ही पावसाचा थेंब बनून तू येशी अंतरी.... थेंबाचं मर्म जेव्हा नदीला कळलं थेंब होण्यास नदी सागर मेघाकडे वळलं राजसा आज ही पावसाचा थेंब बनून तू येशी अंतरी.... डॉ.श्वेता राठोड पुणे

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता