तू असा कसा ? २४/६/२०२१ ------------------------- पंढरीनाथा मानव देह मार्ग सरळ मोक्षाचा चौ-याऐंशीलक्ष योनी नंतरच्या साक्षीचा...१ देहाला दिलेस मन सदा करण्या विचार मंथन तू म्हणतोस करावया हवे सदा सत् चिंतन...२ मनात अनेक विकारी विचारांचा असतो वावर तू सांगे चिंतनाने विचार विकारांना सावर...३ विठ्ठला तू मनःचक्षू दिलेत संसार बघण्यास कसे करावे बरे परिवर्तन स्वला बघण्यास...४ चवीचवीनं खाण्यासाठी दिलीस तू रसना आवड सारी कुठे ठेवू? या अन्नवासना..५ पांडूरंगा नात्या गोत्यात तूच गुंतवतोस बंधाचा हा प्रमाद करू नकोस तूच सांगतोस...६ देवा भाव भावनांचा वाढवतोस तूच गुंता मला सांगतो का व्यर्थ करतोस जगी चिंता...७ देवा संसारी चक्रात मज अडकून पाहतो मजा म्हणे ध्यानमग्न रहा अशी कशी रे देतो सजा...८ या भौतिक जगाचा कसा करू त्याग? कसा मिळवू रे मोक्ष ? पांडूरंगा तू जवळच आसण्याची पटवून दे रे साक्ष..९ सुरेखा कटारिया पुणे.

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!