*बाई तुम्ही शिकवा* आईच्या रूपातल्या बाई मुलांना तुम्हीच शिकवा.. जगात काही सगळेच साधू नसतात काही संधी साधू ही असतात बाई मुलांना तुम्हीच शिकवा... जीवन जगताना सर्वस्व ध्याव पण स्वत्व राखून ठेवाव बाई मुलांना तुम्हीच शिकवा... दृष्टी बदलली तर सृष्टी बदलेल धार बदलली तर किनारा बदलेल बाई मुलांना तुम्हीच शिकवा... प्रौढत्व वयात नसतं वृत्तीत असतं सोळा वर्षाच्या ज्ञानेश्वरात भासतं बाई मुलांना तुम्हीच शिकवा... जीवनाचं भागवत समजलं तरच भगवती समजून उमजेल बाई तुम्हीच मुलांना शिकवा... जीवन प्रवचनात असतात वचन जगण्याच्या प्रगतीत असते गती बाई तुम्हीच मुलांना शिकवा... सुरेखा कटारीया पुणे.चिंचवड

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!