नात्यांची वीण अनेक नाती येती जाती बहुरंगी आसतात नाती कुठे देती दुःख अनुभूती कधी सुख मनास सावरी कधी हसवती तर रडवती हक्काने मित्रत्व राबवती प्रेमाने आपलेसे करती जीवन आनंदाची भरती हे मित्रत्वाचे नाते जपावे मनुष्य जन्म पुन्हा नाही लोक येती जगी जगती टिकून ठेवावी नाती गोती कधी हसावे कधी रुसावे रंग जगण्याचे उधळत रहावे मनास वाटे जरी भांडावे विषय आपुले मांडत राहावे शुद्ध भाव मनी ठेवूनी हवी तितकी मने जोडावी हीच मजा नात्यांची शुद्ध हृदयी साठवावी सुरेखा कटारिया

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण