[5/26, 11:49 AM] Surekha Katariya: नमस्कार रसिकश्रोतेहो कवी बंडोपंत यांचा आनंदभान हा अभंग संग्रह वाचायला मिळाला आमचे स्नेही वादळ कार कवी राजेंद्र सोनवणे यांच्याकडून सर्वप्रथम अभंग संग्रह लिहिणाऱ्या बंडोपंतांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करते आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तत्वज्ञानाचे अनेक संस्कार संस्कारित करण्याचे काम या आनंदभान अभंग संग्रहात प्रकर्षाने जाणवले. ओवी ज्ञानेश्वराची तुकोबांचे अभंग जसे सिद्ध आहेत म्हणूनच ते प्रसिद्ध आहे तद्वत आधुनिक काळातील तुकडोजी महाराजांचे अभंग हे तुकारामांच्या अभंगवाणी ची आठवण करून देत आहेतअनेक सिद्ध महात्म्यांचा संघर्षमय जीवन पट संवेदनाक्षम कवी बंडोपताने या अभंग वाणी मध्ये चितारलेला आढळतो. या अभंगवाणी काव्यरचनेच्या संग्रहात 78 कवितांचा समावेश आहे. ते आपल्या मनोगतात म्हणतात," मी नोकरीच्या निमित्ताने विदर्भातील अनेक गावात गेलो.पंचवीस वर्षात तेराशे गावांना भेटी दिल्या. जनप्रबोधनाच्या निमित्ताने ग्रामीण जनतेशी संवाद साधला आणि त्या निमित्ताने त्या गावातील लोकजीवन, परंपरा,संस्कृती,संस्कार याचा अभ्यास त्यांना करता आला व तेथील विविध समस्या जाणवल्या आणि त्या अलगद कागदावर उतरवताना संवेदनाक्षम मन अधिकच भक्तिरसात रसमय झालं आणि ध्येय प्राप्तीसाठी या कवितेत ते म्हणतात, "ध्येयप्राप्तीसाठी करावा संघर्ष, स्वागत सहर्ष संकटाचे"१)[5/26, 11:49 AM] Surekha Katariya: उत्तम कर्म या अभंगात ते म्हणतात," शब्दांनीच शब्द, वाढवितो वाद, खुंटतो संवाद,आपल्यातlबंडोपंत त्यांच्या अभंग वाणी मध्ये विचार मांडतात .कर्म करत असताना शब्द खूप महत्वचे! ते जपून वापरा. शब्द पूजा शब्द ईश्वर शब्द हा तर ध्यास आहे शब्द दया बंडोपंताचा अल्पसा हुंकार आहे. भावनांचे दूतचे शब्द भावनांचे संक्रमण करतात शब्द कधी हसवतात कधी रडवतात शब्द कधीकधी मनातले भाव ही व्यक्त करण्यास अपुरे पडतात शब्द.आज या अभंग वाणी बद्दल बोलत असता माझी अशीच अवस्था झाली आहे.आज पर्यंत साधु संतांनी समाजमन परिवर्तीत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. त्याचीच कास धरून बंडोपंत कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करून मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद!३)[5/26, 11:49 AM] Surekha Katariya: बंडोपंतांची अभंगगाथा आनंदभान मानवी मनाशी संवादीत होऊन सुसंवाद साधणारी आहे. नाते या काव्यमध्ये ते म्हणतात," नाते आणि नदी दोघेही सारखे l दोन्हीही पारखे किनाऱ्यास ll जन्म आणि मरण या मानवी किनाऱ्यावर पारखे सुंदर कल्पना नदी आणि मानवी नाते या तुलनेने मानवी जीवनातील जन्म आणि मरण दोन किनारे असतात.जगत असताना सामाजिक भान ठेवून परोपकारी प्रवृत्तीने मानव जगत असतो.डॉ बाळासाहेब पदवाडआपल्या प्रस्तावना मध्ये म्हणतात राष्ट्रसंतांचा आजचा देव हा देवालय नाही नाही तर जनता जनार्दनाता आहे. आणि त्यांचा उत्कर्ष त्यांच्यासाठी महोत्सव आहे आहे म्हणून बंडोपंत आपल्या काव्यात म्हणतात, "सेवक व्हा तुम्हीl कराया सुंदर ग्राम हे मंदिरl स्वच्छतेनेll" पुढे ग्रामगीता या काव्यात बंडोपंत म्हणतात,"तुकडोजींच्या ग्रंथ ग्रामासाठी सार्थ मनी घ्यावा अर्थ सेवकांनो"गाडगेबाबांची हाक तुकडोजींच्या कानी पडली आणि बंडोपंतांनी ती आपल्या काव्यात जागविली. आपल्या गुरूची वचन त्यांनी काव्यातून लोकाभिमुख केली आहेत. असे मला वाटते२)

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!