संयम५/५/२०२१ जीत माझी होताना मन माझे हासती मंतरलेल्या भावनांना मन माझे हासती काजळल्या हो क्रोध मोहाच्या भावना भावनाना ठोकताना मन माझे हासती उरीच्या जखमावरी मीठ माणसे चोळती मीठ चोळताना राग द्वेष मज हासती नीशब्द होऊनी दुःख माझे मजशी बोलते बोलले तरी जन मौन पाहूनी हासती विठू ओढ मज लागते तुला भेटण्या चालणाऱ्या पावलांना लोक हासती प्रीत माझी पाहता मज मीरा आठवती आठवता विष प्याला लोक मज हासती संयमी 'सुरेखा' बंधूतेची वाट चालती जळणाऱ्या जणांला मन माझे हासती सुरेखा कटारीया चिंचवड पुणे ३३

Popular posts from this blog

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!

चला चारोळीच्या गावा चारोळी क्रमांक-१८८. श्रावण