सात पिढ्याकाय सांगू कसे सांगू कोरोना नको तू आता सर्वांचा अंत असा पाहू काय करावं कसं करावं माझं मलाच कळेना अन कळल तरी या कोरोनाने वळेनामला चांगलंच आठवतंय वाडवडील म्हणायचे सात पिढ्या बसून खाऊ इतकी आसामी आहे आपली नको त्रास करून घेऊ आपण घरात बसूनच खाऊमला असं वाटतं त्यांनी सांगितलेलं आता खरं ठरत आहे आपलीच ही सातवी पिढी लॉक डाऊनमध्ये बसून खात आहेकाय सांगू बाहेर कोरोना घरात करमेना काय करावं तेच उमजेना किती ही जीबी नेट घेतला तरी पुरे ना माझं मलाच काही ते समजेनाकिती सांगू कसं सांगू काही समजेना झोपल्या नंतर जेवण की जेवण करून झोपावे काय करतोय ते उमजेना माझं मलाच समजेनाआधी नाश्ता.. की आधी आंघोळ.. झोपावं.. की वाचाव., तेच कळेनाकाय करतोय तेच उमजेना माझं मलाच समजेनाझोपेतून उठलो आहे की झोपायला जायचं आहे व्हाट्सअप उघडायच का फेसबुक पाहायचंय काय करावं ते उमजेना माझं मलाच समजेनाबातम्यात कोरोना वर्तमानपत्रात कोरोना आत कोरोना बाहेर कोरोना काय करावं माझं मला उमजेना काय करावं समजेनाकविता करताना माझं कवित्व जागं झालंय की.. डोक्यावर परिणाम झालाय ? तेच उमजेना माझं मलाच काही समजेनाकाय सांगू कसं सांगू माझ मला कळेना कोरोना तू जा आता नको नको सर्वांचा तू असा अंत पाहू असा काय करावं ते समजेनासुरेखा कटारिया पिंपरी चिंचवड पुणे

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

हातात हात पकडला पाहिजे* कविता

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!