जगणे सोडू नका दि.8/5/2021 ---------------------------------- किती सावरले किती आवरले प्रश्नांना तुम्ही मोजू नका, राजकारणाने समाजकारणाला दिली सोडचिठ्ठी म्हणुन, जगणे सोडू नका ll पालकातला संपन्न शिक्षक, शिक्षकातला करुणामय पालक सर्जनशीलता सदा घडो, एकमेकांचे नाते जडो, पिढी घडविताना आयुष्यात चारित्र्य संपन्नता सोडू नका ll किती गरजले किती बरसले काजळलेल्या अवकाशातील, प्रश्न तुम्ही गोंजरू नका सदा जगुया सर्वांसाठी,जगताना मानूसकीचा संस्कार मुळीच सोडू नका ll जरी संवेदनाचा झाला -हास सुसंवादाने जिंकू सारे, अविचार कसला करू नका आचारसहिंता मानवतेची जगताना कधी सोडू नका ll जगण्याला अर्थ प्राप्त व्हावा असे आपण सदैव करू, जरी जगण्यांचा सूर्य प्रखरतेने काजळून गेला तरी, किरणांना आपण शोधून काढू जगताना मानवतेचा मूलमंत्र कधी सोडू नका ll सुरेखा प्रकाश कटारिया चिंचवड, पुणे 33.मो.नं. 9822745030

Popular posts from this blog

आजचे चिंतन आभाळा एवढं मन

भगवान महावीरांच्या मार्गाने गेल्या उज्वल भविष्य डॉक्टर श्वेता राठोड

नाट्यछटा काय म्हणावं या मोठ्यांना...!