मधुसिंधू काव्यरचना (वर्णसंख्या:- ५/६/६/५) *कृष्णार्पण* असे एकत्व मीराकृष्ण काया रुप हे वर्णाया नसे भिन्नत्व ! एका मनात मन मिसळावे ओळखू न यावे जना मनात ! जनाजनात कृष्णरूप मीरा जोडे भक्तीतीरा प्रेममनात ! फिरे बाजारी पाहत प्रतिमा भक्तीचा महिमा गाते मुरारी ! मीरा बावरी विष घेवूनिया भक्ती लेवूनिया कृष्ण सावरी ! सुरेखा कटारीया .पुणे चिंचवड 33. मधुसिंधू काव्य कृष्ण-सुदामा मित्र भेटले तनात तुझिया मनात माझिया सस्कांरातले ! दंग जाहले तुझ्याच सूत्रात चैतन्य मित्रात भरभरले जोड आपुली केशव सुदामा पोहे प्रियतमा खायी मुरली सुरेखा कटारीया.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता