रंग प्रभुचे पहाटे गुलाबी रंग प्रभुचे, किरणांच्या आश्वावरचे, सूर्यरथाच्या तेजस्वी वदने, मंद वायुचे घेऊनी झेले, असे गुलाबी रंग प्रभूचे ही निसर्गाची रम्यमय पहाट मलमली त्या पहाटेने, मन भरून भारून जाते, चमचमणाऱ्या दवबिंदूनी मोहून टाकते जगण्याची वाट. असे गुलाबी रंग प्रभूचे ही निसर्गाची रम्यमय पहाट मंडपातील या नभीच्या, अनंत दीप हे झळकती खग करती मंजूळ गान कोकीळ सूराने आनंदी पहाट, असे गुलाबी रंग प्रभूचे ही निसर्गाची रम्यमय पहाट. सुरेखा कटारीया चिंचवड पुणे 33

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता