गझल-गंधस्मृतीचा

गझल- गंधस्मृतीचा

दि.1/4/2021,गुरुवार

चंद्रकिरण येथे त्याच्या रूपात येई
स्पर्शताच जणू  अंग मोहरूनी जाई
लोचन माझे तुजसवे मिठीत ठेवू

लग्नात 'हार' घालुनि स्मृती जपून ठेवू
हृदयात रंग भरून भाव  स्मृतीत ठेवू

निशब्द भावनांवर वसंत बरसत ठेवू
बरसता धारा मन कसे काबूत ठेवू

या वसुंधरेचे उन्मेश कसे  थांबून ठेवू
स्पर्शाने  मोहरनारे कसे थांबवून ठेवू

भावनेत रंग भरून मनात लिहून ठेवू 
गंध तुझा मज हृदयात  आठवून ठेवू

'सुरेखा' तुझ्या स्मृतीला कसेअडवून ठेवू
अनमोल देणगी तुझी मनी साठवून ठेवू

 सुरेखा कटारिया पिंपरी चिंचवड पुणे.
मो. नं.9822745030

Popular posts from this blog

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता

आजचे चिंतन आभाळा एवढं मन