पैलतीर ड्रेस येवढा तंग कशाला संयमाचा भंग कशाला निस्तेज चेहरा झाकायाला ब्युटीपार्लर संग कशाला अहिंसेने मन जिंकून घ्यावे राग द्वेषाचा ढंग कशाला जिनेश्वराचे नाम मुखी घ्यावे इग्लीशचा रंग कशाला दुनियादारीच्या जगामध्ये छेडायाचे जंग कशाला या मोहाच्या पाशामध्ये अध्यात्माचा भंग कशाला शरीरामध्ये आत्मा असता शोधण्याचा चंग कशाला ऐल तीरावरून पैलतीरी कषायामध्ये दंग कशाला सुरेखा कटारिया.चिंचवड, पुणे.

Popular posts from this blog

नागपंचमीचा संबंध 'नाग' ह्या सरपटणा-या नागाशी 🐍 नसून, भारतात 'नाग' हे 'टोटेम' असणारे पाच पराक्रमी नाग वंशीय राजे होवून गेले, त्यांच्याशी आहे ..!!*

चारोळीच्या गावात चारोळी क्रमाक- १८३ लोकमान्य टिळक

हातात हात पकडला पाहिजे* कविता